उदगीर : प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन, नांदेड, इतिहास संकलन समिती, महाराष्ट्र प्रांत, इतिहास विभाग महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय व इतिहास विभाग, कै बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ व १५ फेब्रुवारी रोजी येथील किल्ल्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व वारसा जतन जागृती मोहीम राबविण्यात आली.
यात उदयगिरी, एकंबेकर, श्री हावगीस्वामी, मातृभूमी, महात्मा फुले, रामराव पाटील, फर्ग्युसन कॉलेज, पुणे, शंकर मा. व उ.मा विद्यालय, उदगीर, रसिका महाविद्यलाय,देवणी, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे,माऊली बीएचएमएस कॉलज ,पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन कॉलेज, लातूर या विविध महाविद्यालयातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी म.ए.सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजयकुमार पाटील, मृदुलाताई पाटील, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संदीकर, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर हे उपस्थित होते, ही स्वच्छता मोहिम अभिमानास्पद असल्याचे मत रामचंद्र तिरुके साहेब यांनी व्यक्त केले. किल्ल्याचे स्थापत्य प्रा. डॉ. शिंदे अनंत, प्रा.डॉ. संजय सोमवंशी, प्रा. बड़गिरे नामदेव यांचे मार्गदर्शन लाभले. दुस-या दिवशी स्वच्छता मोहिमेनंतर दुपारी समारोप आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नरसिंग ढोणे, अमित राठोड़, उद्धव राठोड़,अमोल गोटे,मयूरेश खड़के, स्रेहल खड़के, प्रियंका केंद्रे, बनसोडे, प्रा. डॉ. गणपत गट्टी हे उपस्थित होते. नरसिंग ढोणे, अमित राठोड, अमोल गोटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात किल्लारक्षक संदीप वांजे, राजेंद्र बोनवळे, विकास वट्टमवार, बजरंग कोळीकर यांचा सत्कार करण्यात आल. तसेच विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी किल्ला स्वच्छता व वारसा जतन जागृती मोहीम समन्वयक प्रा.डॉ. माधवी महाके, इतिहास विभागप्रमुख प्रा डॉ संजय सोमवंशी, इतिहास विभागप्रमुख डॉ अनंत श्ािंदे प्रा. चिलमे प्रिया, प्रा. शकुंतला फुलवाड, प्रा. मिनाक्षी घोडके, प्रा. डॉ. महाळंकर बालाजी, प्रा. डॉ. रेखा लोणीकर, प्रा. डॉ. विणकर विजय,प्रा. डॉ.जोगन मोरे, प्रा. नामदेव बड़गिरे, प्रा. वर्षा बिरादार,प्रा. पाटील योगेश यांनी परिश्रम घेतले.
जयंतीच्या निमित्ताने वारसा जतन मोहिमा राबवाव्यात असे मत विद्यार्थी अनास पारकोटे, गायकवाड जाल्ािंदर, स्वामी ऋषिकेश,सचिन सोनकांबळे, म्हैत्रे नम्रता, गजानन वाकळे, म्हैत्रे त्रिशरण, क-हाड विक्रम, चव्हाण चंदा, आदित्य गायकवाड, पवार विष्णू, शिळे संगीता, देवकर बालाजी, लक्ष्मण पाटील, घुगे गोपाळ, शरद सोनकांबळे, जोशी प्रसाद, ओमकार बनसोडे, प्रकाश कांबळे, काळे मंगल, शुभांगी भालेराव, कांबळे अनिता आदी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.