21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरबोरी भागात ढगफुटी, शेतकरी अडचणीत; ५० गावांतील सोयाबीनसह इतर पिकांचे नूकसान

बोरी भागात ढगफुटी, शेतकरी अडचणीत; ५० गावांतील सोयाबीनसह इतर पिकांचे नूकसान

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरच्या पुर्व भागात बाभळगाव, बोरी, भातांगळी परिसरातील किमान पन्नास गावात ढगफुटी होवून सोयाबीन व खरिपाच्या पिकाबरोबर इतर फळझाडे, फुलझाडे, मोठे वृक्ष, लाईट खांब उन्मळून पडून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने लातूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

विद्यामन खरीप हंगामात दि. १७ व १८ जूलैदरम्यान अचानक लातूरच्या पुर्व भागात बाभळगाव, बोरी, भातांगळी परिसरातील किमान पन्नास गावात ढगफुटी होवून जोरदार पाऊस पडला आहे. सोयाबीन व खरिपाच्या पिकाबरोबर इतर फळझाडे, फुलझाडे, मोठे वृक्ष, लाईट खांब उन्मळून पडून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे निवेदन लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी लातूर तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष घोडके, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका लातूर ग्रामीण चेअरमन प्रविण पाटील, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका औसा चेअरमन बबन भोसले, विलास कारखाना संचालक गोविंद बोराडे, संचालक रेणा संभाजी रेड्डी, ज्ञानोबा गवळे तालुका अध्यक्ष ओ. बी. सी सेल, प्रताप पाटील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य धनंजय वैद्य, अमोल देडे, संजय चव्हाण, अमोल भिसे, अच्युत चव्हाण, संजय चव्हाण, सतिश शिंदे, अंगद वाघमारे, अरुण विर, बालाजी वाघमारे, नरेंद्र आल्टे सरपंच मसला, हरिश्चंद्र कावळे, आशोक सुर्यवंशी, कासारगाव सरपंच दीपक काळे, बोरगाव सरपंच नरेश पवार, उमेश भिसे युवक काँग्रेस सदस्य, चंद्रकांत अडगळे सरपंच वाडीवाघोली, प्रकाश चव्हाण, रणजित झाडके, दिनकर डोपे, परमेश्वर पवार, रणजित पाटील, नरेश पवार, रमेश भिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चाकुर तालुक्यात सर्वाधिक तर देवणीत सर्वात कमी पाऊस
लातूर जिल्ह्यात रविवारी जोरदार पाऊस झाला. लातूरच्या पुर्व भागातील जवळपास ५० गावांची शेती पाण्याखाली गेली. पिकांचे मोठे नूकसान झाले. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत चाकुर तालुक्यात सर्वाधिक ३७.८ मी. मी. तर देवणी तालुक्यात सर्वात कमी १.५ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात रविवारी झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे यंदाच्या मोसमातील आजपर्यंतच्या एकुण पावसाची आहेत. लातूर-१२.५ मी. मी. (१७३.८ मी. मी.), औसा-२.१ (१६१.९), अहमदपुर-१२.१ (१४६.४), निलंगा -१८.५ (१८५.९), उदगीर-१५.७ (१८१.५), चाकुर- ३७.८ (१७३.५), रेणापूर-२९.९ (१७९.१), देवणी- १.५ (९२.९), शिरुर अनंतपाळ- १२.६ (१९०.५), जळकोट- ६.७ मी. मी. (२१६.७ मी. मी. ), एकुण- १५.७ (१७१.० मी. मी.) पावसाची नोंद झालेली आहे.

टेंभुर्णी बस स्टँडसमोर जनशक्ती संघटनेचे झाडे लावून आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या