लातूर/परभणी : लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची आज अकोला येथे बदली झाली असून, तेथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते रुजू होणार आहेत, तर लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून परभणी येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. हे रुजू होणार आहेत, तर पृथ्वीराज बी. पी. यांच्या जागी एस. टी. टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जी. श्रीकांत यांनी लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून चांगला कार्यकाळ गाजविला. एक कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती, तर आता रुजू होणारे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनीदेखील परभणीत मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर कार्य करताना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या जबाबदारीसोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विभागाची जबाबदारीही सांभाळली. अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या पृथ्वीराज यांनी जिल्हा परिषदेतील कामकाजास चांगली शिस्त लावली होती. तसेच अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत जिल्हा परिषदेतील कारभारात सुधारणा घडवून आणल्या होत्या.
अंजू बॉबी जॉर्जची देदीप्यमान कामगिरी