चाकूर : चाकूर तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारीचाकूर शहरातील एका पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला व रविवारी नळेगाव येथील एका पॉझिटीव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी चाकूर येथील कोवीड सेंटरला अचानक भेट दिली व तेथील पॉझिटीव्ह रुग्णांशी त्यांनी संवाद साधला, दिले जाणारे जेवण व्यवस्थित आहे का ? डॉक्टरांकडुन व्यवस्थित तपासणी होते का,याची रूग्णांना विचारणा केली असता आतीशय चांगले जेवण मिळते व तपासणीही व्यवस्थित असल्याचे बाधीत रुग्णांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले,तेंव्हा तहसिलदार शिवानंद बिडवे व डॉक्टरांचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.
तपासणीसाठी आलेल्या एका रूग्णांच्या स्वॅबची तपासणी स्वत: जिल्हाधिकारी यांनी केली. तेंव्हा त्या व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्या व्यक्तीचे डोळे पानावले नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाने कोवीड सेंटरमध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवावी, डसबीनची वाढ करून व्यवस्था करावी,काही रुग्णांच्या रूम मध्ये टेबल फॅन होते त्याठिकाणी सिंिलग फॅन लावावेत असे नगरपंचायचे मुख्याधिकारी अजींक्य रनदीवे यांना सूचना दिल्या व सेंटरमध्ये तात्काळ जास्तीच्या बेड उपलब्ध करण्यात याव्यात असे निर्देश तहसीलदारांना जिल्हाधिकारीनी दिले.डॉक्टरांशीही अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.कोविड सेंडरमध्ये काय कमतरता आहे, कोणत्या सुविधांचा अभाव आहे का? या संदर्भात डॉक्टरांना विचारपूस केली आणी डॉक्टरांचे व रूग्णांचे मनोबल वाढविले. व तेथील प्रत्येक रूमची स्वच्छता तपासून पाहिली.
शनिवारी चाकूर शहरातील एका बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला होता त्यांच्या घरातील व्यक्तींशी सुवीधेसंदर्भात विचारणा केला. पॉझिटीव्ह रूग्णांनी घाबरून न जाता कळजी घ्यावी यासंदर्भात तेथील पॉझिटीव्ह रूग्णांना कॉंन्सलींग करण्यात आले. व पॉझिटीव्ह रूग्णांनी सेंटरमधील पॉझिटीव्ह रूग्णांना काही आडचण आली तर माणुसकी दाखवून त्या रुग्णांना धिर द्यावा व त्याला काही मदत लागल्यास मदत करावी असे आहवान जिल्हाधिकारी यांनी बाधीत रूग्णांना केले.
व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांची तपासणीचे आदेश
नळेगाव येथे दररोज रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे तेथिल व्यापारी, भाजीपाला विक्रेते,दुकानदार यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. तपासणीचे बॉक्स वाढवावेत व बेडची संख्याही तात्काळ वाढवण्याचे आदेश तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजींक्य रणदीवे सह डॉक्टर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
भूम येथे व्यापा-यांच्या आज होणार रॅपिड अॅन्टीजेन कोरोना टेस्ट