लातूर : प्रतिनिधी
येथील खाडगावच्या स्मशान भूमीची पहाणी करण्यासाठी व स्मशानभूमीच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल या संदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी भेट देऊन स्मशान भूमीची प्रत्यक्ष पहाणी केली. या वेळी श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अजय पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. कुमार बनसोडे, महाविद्यालयातीलशिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विधार्थी यांची विशेष उपस्थिती होती.
श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून खाडगाव स्मशानभूमीला दत्तक घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता करण्याबरोबरच स्मशानभूमीत वृक्षारोपन करुन त्याचे संगोपन व संवर्धन केले आहे. स्मशानभूमीत आलेल्या नागरिकांना आपण एका उद्यानात आलो आहोत वृक्षवेलीच्या छायेत या स्मशानभूमीचे नंदनवन करावे या दृष्टिने महाविद्यालयाने केलेल्या कार्याचे कौतूक या पूर्वी मीडियाने दूरदर्शनवर प्रत्यक्ष चित्रीकरण करण्था बरोबरच प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याशी संवाद करुन महाविद्यालयाने केलेल्या कार्याची सामाजिक स्तरावर चर्चा घडवून आणली. सद्यस्थितीत स्मशानभूमीच्या संदर्भात ज्या अंतर्गत व बाहय अशा ज्या समस्या आहेत त्या प्रत्यक्ष पाहून सोडविण्याचे आश्वासन आयुक्त मित्तल यांनी दिले.
स्मशानभूमीच्या गेटसमोर रिंगरोडकडून येणा-या नालीतील पाणी तुबंत आहे. ते दुरुस्त करण्याबरोबरच स्मशानभूमीच्या भिंती, पडलेले बांधकाम अदि कामकाजा संदर्भात आयुक्त मित्तल यांच्याशी चर्चा केली. या वेळी डॉ. मल्लीकार्जून करजगी, डॉ. वेदप्रकाश मलवाडे, डॉ. माधव पलमटे, डॉ. बाळू कांबळे या बरोबरच शिक्षकेत्तर कर्मचारी पठाण, सारगे, कुभांर, चंदु आणि महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.