21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरशोध व सुटका याची आपत्ती व्यवस्थापनाकडून रंगीत तालीम

शोध व सुटका याची आपत्ती व्यवस्थापनाकडून रंगीत तालीम

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील धरणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत आपत्ती व्यवस्थापनाची मेगा मॉक करण्यात आले. प्रशासनाकडून पूर परिस्थिती यामध्ये विविध स्तरावरील शासकीय यंत्रणा प्रामुख्याने महसूल, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे विभाग ईत्यादी एखादी आपत्ती कोसळली तर त्यास त्यांचा त्या घटनेस प्रतिसाद, व तसेच पोलीस पंचनामा, प्रथमोपचार ईत्यादी घटनाक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दांडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते.

जिल्ह्यात यंदा मान्सूनची दमदार सुरुवात झाली असून सर्वदूर संततधार पाउस पडत आहे. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी बुधवारी रंगीत तालमीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिक व शासकीय यंत्रणेला आपत्ती प्रतिसादाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुरात अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्याची सुटका करणे तसेच वाहून चाललेल्या व्यक्तीचे बचाव करणे, त्यांना स्थलांतरीत करणे, प्रथमोपचार करणे या बाबी प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून करून घेण्यात आले. यावेळी महसूल, पोलीस, आरोग्य पाटबंधारे विभाग, जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य व संबंधित विभागांनी त्यांची भूमिका समजून घेण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दांडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

तसेच आपत्तीची पूर्वसूचना देऊन नागरिकांना आपत्ती प्रवण भागात न जाण्याच्या सुचना देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी सर्व यंत्रणेस सांगितले. सदर रंगीत तालिमी मध्ये एखादी आपत्ती जर अचानकपणे कोसळली तर सर्व यंत्रणा सज्ज रहावी याचा अभ्यास घेण्यात आला. यात सर्वच यंत्रणांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास स्थानिक नागरिकांची गर्दी जमली होती. ही रंगीत तालिम जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या सूचनेनुसार व निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी संचलित केली. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभाग प्रमुखांसह शासनास सादर करण्यात येणार आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार उदगीर रामेश्वर गोरे, तहसीलदार जळकोट, सुरेखा स्वामी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील डॉ. कुलकर्णी, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने उपस्थित होते. सदर रंगीत तालिमीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, लातुरचे अग्निशमन अधिकारी शेख जाफर, उदगीरचे अग्निशमन अधिकारी विशाल आलटे, निलंग्याचे अग्निशमन अधिकारी गंगाधर खरोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे गोपाळ शिंगडे, श्रीराम वाघमारे, किरण जाधव, करीम शेख, ए. एन. भालेराव, वाहन चालक राठोड, रफीक ईत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या