27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात आढळली रंगीत करकोचाची वसाहत

लातूर जिल्ह्यात आढळली रंगीत करकोचाची वसाहत

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आपल्या आकर्षक रंगसंगतीने रंगीत करकोचा असे नामानिधान मिळवलेल्या या पक्षाची एक मोठी वसाहत झ्रसारंगागार (हेरॉनरी) निलंगा तालुक्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात पक्षीमित्र धनंजय गुट्टे यांना आढळली असून सध्या या झाडांवर सुमारे २५० रंगीत करकोचांचे संसार त्यांच्या ४०० पेक्षा अधिक चिलांपिलांसह सुखेनैव नांदत आहेत. बिएनएचसे उपसंचालक राजू कसंबे यांनी या स्थळास भेट देवून समाधान व्यक्त केले आहे.

पक्षीमित्र धनंजय गुट्टे हे काही दिवसापूर्वी मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात भटकंती करत असताना त्यांना पक्षाचे आवाज कानी पडले व उत्सुकतेपोटी ते त्या दिशेने गेले व तेथील चार बाभळींच्या झाडांवर शेकडो रंगीत करकोचे, त्यांची पिले, घरटे हा सुखद नजारा त्यांच्या दृष्टीस पडला. ही वसाहत पाहून त्यांच्या आनंदाला पारवर राहीला नाही. त्यांनी तातडीने ही सुखद वार्ता वनविभाग, बीएनएचएचस व काही पक्षीमित्रांस कळवली. गुरुवारी मुंबईहून आलेले बिएनएचएसचे उपसंचालक राजू कसंबे, वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे , वनपरिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार. जैवविविधता समितीचे सदस्य शहाजी पवार व शोधकर्ते धनंजय गुट्टे यांनी त्या वसाहतीस भेट देवून पक्षांची गणना केली. यात २३० घरटी, लहान मोठे ४४० पक्षी आढळले. तेथील घरट्यांची संख्या पहाता यापेक्षा अधिक पक्षी तेथे असावेत असा अंदाज कसंबे यांनी व्यक्त केला.

संकटसमिप यादीत (निअर थ्रेटंड) समाविष्ठ असलेलेले हे पक्षी साधारणपणे पाणी , खाद्याची उपलबध्दता व प्रजननाची सुलभता असलेला परिसर अधिवासासाठी निवडतात. तेथे ते घरटी बांधतात फेब्रुवारी ते जून महिना हा त्याचा प्रजननकाळ असतो. मासे, बेडुक, गोगलगाई व अन्य छोटे जलचर हे या पक्षांचे खाद्य असते. त्यांच्या विष्ठेत नत्र, स्फुरदाचे प्रमाण अधिक असल्याचे ते शेतीसाठी खत म्हणून वापरता येते. शेतक-यांना या पक्षाचा त्रास होत नाही. लातूर जिल्ह्यात प्रथमच अशी वसाहत आढळली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या