लातूर : माजी मंत्री तथा काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधी व मानवी हक्क माहिती अधिकार विभागाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी शैलेश देव यांची निवड झाल्याचे पत्र आज बाभळगाव निवासस्थानी त्यांना देऊन अभिनंदन केले.
आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधी व मानवी हक्क माहिती अधिकार विभागाचे उपाध्यक्ष ॲड. विश्वजीत शिंदे, किसान काँग्रेस उस्मानाबादचे सरचिटणीस बालाजी नायकर आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.