30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर आ. सतीश चव्हाण यांच्या विजयाची हॅट्रिक साधून महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी

आ. सतीश चव्हाण यांच्या विजयाची हॅट्रिक साधून महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी

एकमत ऑनलाईन

लातूर : विधान परिषदेच्या मराठवाडा मतदार संघातून आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयाची विक्रमी मताधिक्­याने हॅट्रिक साधावी आणि या निमिताने महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन करुन लातूर जिल्ह्यातून त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ दि. २६ नोव्हेंबर रोजी येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, बाळासाहेब जाधव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात आमदार सतीश चव्हाण यांच्या ऐतिहासिक विजयाचा संकल्प यावेळी करण्यात आला.

महविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पदवीधर मतदारांच्या गाटीभेटी, मतदारांशी संवाद, मेळावे महविकास आघाडीकडून घेतले जात असून याचाच एक भाग म्हणून लातुरात महविकास आघाडीकडून या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात ३ लाख ७५ हजार पदवीधर मतदार असून पैकी लातूर मधील ४१ हजार २४९ मतदार आहेत. मेळाव्याच्या प्रारंभी २६/११ मधील हुतात्म्यांना अभिवादन तर गेवराईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या रेणापूर तालुक्यातील चौघांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महाराष्ट्राची शान उंचावण्याचा प्रयत्न करण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी पदवीधर मतदारांनी सतीश चव्हाण यांचा प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. महाविकास आघाडी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. ज्याचे स्वागत देशात झाले. औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती, धुळे मतदारसंघातील पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महाविकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केलाÞ. जिल्हा तिथे विद्यापीठ ही महत्वकांक्षी योजना महाविकास आघाडी सरकारने स्वीकारली असून सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून यापुढे देखील वैद्यकीय शिक्षण विभागात आणखी नवनवीन बदल करून महाराष्ट्राची शान उंचावण्याचा प्रयत्न करण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प असल्याचे सांगत सतीश चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन ना. अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले.

महाराष्टाचे सौहार्द जपले पाहिजे
मराठवाड्याला आणखी पुढे घेऊन जायचे आहे, असे नमुद करुन पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूरला आरोग्य विज्ञान विभागाचे विभागीय केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न असुन जिल्हा तिथे विद्यापीठ हे सुत्र स्वीकरले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेÞ महाराष्ट्राचा स्वाभीमान, अभिमान उंचावण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेतÞ आपण सर्वांनी महाराष्टाचे सौहार्द जपले पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.

आमदार विक्रम काळे यांनी यावेळी बोलताना पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक ंिरगणात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचे कार्य पाहता प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करीत वैद्यकीय शिक्षणात प्रवेशासाठी असलेला ७०/३० अध्यादेश रद्द, आरोग्य विज्ञान विद्यापीठ उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे अभिनंदन केले. पदवीधर मतदार संघ निवडणुकीत काय होणार याचे निकाल आधीच लागले आहेत मात्र काही शक्ती राज्यात व देशात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत अर्जुन खोतकर यांनी भाजपाला लक्ष केले व या निवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावावी आणि सतीश चव्हाण यांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड म्हणाले की, या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी या मेळाव्यास उपस्थित असलेल्या प्रत्येक पदवीधर मतदाराने काम करावे जेणेकरून ही निवडणूक महा विकास आघाडीला ंिजकता येईल असे म्हणत आपण स्वत: उमेदवार आहोत हे लक्षात ठेऊन कामाला लागावे असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आपली सत्ता येणार महाविकास आघाडी सरकार जाणार असे स्वप्न भाजपाला पडत असून याला मुंगेरिलाल के हसीन सपने येवढाच म्हणावं लागेल यांची स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीत. गोर गरीब माणसाला मदत करण्याची भूमिका घेऊन सत्तेत आलेले हे महा विकास आघाडी सरकार असून कोरोना १९ प्रादुर्भाव काळात देखील खंबीर पणे उभे आहे तर दुसरीकडे सहकार्य न करता केवळ त्रास देणे हेच भाजप करीत आहे असे म्हणत भाजपाला लक्ष तर केलेच शिवाय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची
काँग्रेस व राष्ट्रवादी मधून भाजपा गेलेल्यांना भाजपा थांबवण्यासाठी सध्या त्यांच्याकडून येत्या दोन महिन्यात आमचीच सत्ता येईल असे म्हटले जात आहे पण हे काही सत्यार्थ उतरणारे नाही असे म्हणत भाजपाच्या अशा वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची असून निवडणूक आचार संहिता असल्याने घोषणा करता येणार नाही असे म्हणत मी पुन्हा येईन असेही जयंत पाटील म्हणाले. ना. अमित विलासराव देशमुख यांचे भाषण ऐकताना लोकनेते विलासराव देशमुख जणू बोलत आहेत असे वाटते असे म्हणत त्यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान येत्या दोन महिन्यानंतर आमची सत्ता येणार असे म्हणत आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लादायची व भाजपचे सरकार स्थापन करायचे असा विचार करणा-यांना जनता वेळ प्रसंगी उत्तर देईल असे सांगत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना बाबासाहेब पाटील यांनी महविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन केलं. यावेळी माजी आमदार वैजनाथ श्ािंदे, त्र्यंबक भिसे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, अशोक पाटील निलंगेकर, बसवराज पाटील नागराळकर, श्रीशैल उटगे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, किरण जाधव, रमेश माळी, मकरंद सावे, अफसर शेख, बबन भोसले, अभय साळुंके, मदन धुमाळ यांच्यासह लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महविकास आघाडीचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच सर्व सेलचे पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती होती.या मेळाव्याचे सूत्रसंचलन प्रा.गणेश बेळंबे यांनी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या