लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची सोमवार दि. ११ जुलै रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर तालुक्यातील महापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी महापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप माने, व्हाईस चेअरमन गोविंद नागराळे, अनंतराव माने यांच्यासह संचालक सर्वश्री बाबू ढमाले, सुरेश भंगे, हरिभाऊ माने, दत्तात्रय मोहिते, उत्तम राजे, अभय माने, उत्तम वरवटे, महेश माने, ज्ञानेश्वर माने आदी उपस्थित होते.