22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरहास्यकवी नायगांवकरांच्या काव्य वाचनाने सभागृहात हास्याचे फवारे

हास्यकवी नायगांवकरांच्या काव्य वाचनाने सभागृहात हास्याचे फवारे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगांवकर यांच्या काव्य वाचनाने दयानंद सभागृहात हास्याचे फवारे उडाले. तासाभराच्या त्यांच्या काव्य वाचनाने उपस्थितांची हसून हसून मुरकुंडी उडाली. त्यांच्या प्रत्येक हास्यकविताला श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून दाद दिली.

रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने डिस्ट्रिक्ट ३१३२ ची १४ वी दोन दिवसीय कॉन्फरन्स लातुरातील दयानंद सभागृहात नुकतीच झाली. या कॉन्फरन्समध्ये अशोक नायगांवकर यांनी ‘मिश्कीली आणि कविता’ या विषयावर हास्य कविता सादर करुन वातावरण हलके- फुलके केले. समीक्षक, परीक्षक आणि हास्य कवी म्हणून उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असणा-या नायगांवकरांनी खुसखुशीत, विनोदी तरीही मर्मभेदी कवितातून रोटेरियनचे मनोरंजन केले.

‘अच्छे दिन येणार’ गोड बोलायला कुणाला लावता? अशी सुरूवात करीत अशोक नायगांवकर यांनी सध्याच्या राजकीय वातावरणालाच हात घातला. अनेक सामाजिक विषयावर कविता सादर करून त्यांनी टाळ्या मिळवल्या. ‘वेड लागण्यापूर्वी’ ही सुचलेली दीर्घ कविता प्रचंड दाद मिळवून गेली. त्यांनी आपल्या काव्यवाचनात महिलांच्या गौरवपर कविता, घराला घरपण देणारी माणसं आदी कविताही सादर केल्या. ‘शाकाहारी’ ही कविता सादर करुन त्यांनी आपल्या काव्य फैफिलीचा समारोप केला. फळभाज्यांवर केलेली ही शाकाहारी कविता प्रचंड दाद मिळवून गेली. तासभर श्रोत्यांनी हस्यांचे फवारे, धबधबे अनुभवले.
कॉन्फरन्समध्ये देशभर वेगळ्या कारणाने गाजलेली आणि तृतीयपंथीयांचे प्रश्­न, समस्या शासनदरबारी, समाजाच्या व्यासपीठावर पोटतिडकीने मांडणा-या दीशा पिंकी शेख यांचे व्याख्यान ही एक पर्वणीच होती. त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सभागृह खचाखच भरले होते. ‘लिंगभाव आणि आपला समाज’ या विषयावर बोलतांना दिशा पिंकी शेख यांनी तृतीयपंथीयांना हिणवले जाते, त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते, त्यांना हिणवले जाते. याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. हे आता कुठेतरी थांबायला हवे. तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठ घेवुन समाजसेवा करर्णा­या क्लबने आपल्यासारख्या समाजाने दुर्लक्षित केलेल्या तृतीयपंथीयास बोलवून, उचित सन्मान केला याबद्दल रोटरी क्लबचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, असे म्हणूत त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.

औशातील नाथ संस्थानचे पीठाधिश व पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपल्या आशिवर्चनात रोटरीच्या सेवाकार्याचे तोंड भरून कौतुक केले तसेच रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या कार्याचे मुक्त कंठाने कौतुकही केले. डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी येन्या ५ जून रोजी रोटरीच्या वतीने ‘चंद्रभागा स्वच्छ अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे सुतोवाच आपल्या भाषणात केले होते. त्याचा धागा पकडत हभप गहिनीनाथ महाराज यांनी रोटरी क्बलच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले. पंढरपूर देवस्थान समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहेच पण, रोटरी क्लबच्या वतीने चंद्रभागाच्या दोन्ही कडेचा भाग स्वच्छ करण्यात येणार आहे. ही बाब ऐतिहासिक आहे, देवस्थान समिती व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या अभियानास हवे ते सहकार्य करण्यात येईल..’स्वागत आहे पंढरीत रोटरी क्लबचे … ‘ अशा शब्दात त्यांनी आश्­वासित केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या