22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरअटल भूजल योजनांतर्गत रिचार्ज शॉफट कामांचा शुभारंभ

अटल भूजल योजनांतर्गत रिचार्ज शॉफट कामांचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
केंद्र शासन व जागतिक बँक यांचे संयुक्त विदयमाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत लातूर जिल्हयातील १३६ गावांत अटल भूजल (अटल जल)योजना राबविण्यात येत आहेत. अटल भूजल योजनेअंतर्गत अंमलबजावणी टप्पातील मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) कामे करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने लातूर तालुक्यातील महापूर ता. जि. लातूर येथे रिजार्च शॉफट कामाचा शुभारंभ सरपंच शिवाजी बनसोडे, ग्रामसेवीका एस.जी. ढोबळे यांचे हास्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला जलसुरक्षक गोविंद गायकवाड, हनुमंत भादरगे, अक्षय पटारे, भूजल तज्ञ चंद्रशेखर सुरवसे, जलसंधारण तज्ञ शुभम शिंदे, माहिती शिक्षण संवाद तज्ञ एच.आर. नाईक, अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, लातूर व जिल्हा अमंलबजावणी भागीदारी संस्था प्रतिनिधी व ग्रामस्त उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या