26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरविद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजेच संवाद कौशल्य

विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजेच संवाद कौशल्य

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा व्यावहारिक जीवनात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. धनाजी आर्य यांनी केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे ‘डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल्स’ या विषयावर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे, प्रा. मेघा पंडित, डॉ. गजानन बने, डॉ. रामशेट्टी शेटकार, प्रा. विद्या गिराम, डॉ. ललित ठाकरे, डॉ. नंदिनी कोरडे, डॉ. रोहिणी शिंदे, डॉ. कोमल गोमारे, प्रा. श्वेता मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

संवाद कौशल्य ही एक कला आहे. एखादा व्यक्ती यशस्वी होण्यासाठी त्याच्यातील संवाद कौशल्याचा फार मोठा वाटा असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी भाषेवर प्रभुत्व व संप्रेषण कौशल्य मिळवण्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे आणि आपल्या मनातील भावभावना, विचार समोरच्या व्यक्तीजवळ मांडता आल्या पाहिजेत, असे सांगून डॉ. आर्य म्हणाले की, मुलाखत तंत्र, गटचर्चा, सादरीकरण कौशल्य, भाषण कौशल्य, देहबोली, आवाजातील चढ उतार व श्रोत्यांना खिळवून ठेवणे आदी तंत्र अवगत केले पाहिजे आणि आत्मविश्वासातून संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. धनाजी आर्य यांनी केले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी व उज्ज्वल भावी आयुष्यासाठी संवाद कौशल्यावर भर द्यावा, असे म्हणाले. या प्रसंगी सुनील राक्षे, बालाजी येमपुरे, शंकर भालके, अमोल क्षिरसागर आदी शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या