26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeलातूरडीएपी मिळत नसल्याच्या २० शेतक-यांच्या तक्रारी

डीएपी मिळत नसल्याच्या २० शेतक-यांच्या तक्रारी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हयात यावर्षी ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरा होणार आहे. या क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी लागणा-या रासायनीक खताची जमावा जमव करत असताना शेतक-यांनी डीएपी खताला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्हयातील २० शेतक-यांनी डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी कृषि अधिक कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाकडे आल्या आहेत.

जिल्हयात खरीप पेरणीच्या अनुशंगाने शेतक-यांनी मशागतीची तयारी पूर्ण केली आसून पावसाचेही आगमन कांही परिसरात झाले आहे. यावर्षी जिल्हयात ५ लाख ९५ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक ४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार आहे. त्यासाठी शेतक-यांकडून रासायनीक खताची जमा जमव करण्यात येत आहे. शेतक-यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी डीएपी खताला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे डीएपी खताचा जिल्हयात तुटवडा जाणवत आहे.

कृषि विभागाने खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्­ट पर्यत सकाळी ८ ते संध्­याकाळी ८ या कालावधीत तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित केला आहे. त्यासाठी ९४०५६५३०४६ या क्रमांकावर शेतकरी कृषि निविष्­ठाच्­या बाबतीत तक्रार असल्­यास शेतकरी फोन करून तक्रारी नोंदवत आहेत. जिल्हयातील शेतकरी खत मिळत नसल्याने तक्रार निवारण कक्षाकडे तक्रारी करत आहेत.

निलंगा तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी -कृषि विभागाने खरीप हंगामासाठी सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे डीएपी खत उपलब्ध होत नसल्याच्या २० शेतक-यांनी तक्रारी केल्या आहेत. यात सर्वाधिक ६ तक्रारी निलंगा तालुक्यातील शेतक-यांनी केल्या आहेत. उदगीर तालुक्यातून ३ तक्रारी, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, लातूर तालुक्यातून प्रत्येकी २ तक्रारी, तर जळकोट, रेणापूर, औसा तालुक्यातील प्रत्येकी एका शेतक-याने तक्रार नोंदवली आहे. तसेच जिल्हयातील तक्रारींच्या व्यक्तीरिक्त देवणी व उदगीर तालुक्यातील शेतक-यांनी राज्य स्तरावर कृषि विभागाकडे ७ तक्रारी केल्या आहेत.

मागणीच्या ३० टक्के डीएपी उपलब्ध
कृषि विभागाने खरीप हंगामासाठी रासायनिक खताची मागणी केली होती. गेल्यावर्षी व याही वर्षी मागणीच्या ३० टक्के डीएपी खत उपलब्ध होत असल्याने डीएपीचे प्रमाण कमी आहे. त्याचीच शेतकरीही अधिक मागणी करीत आहेत. जिल्हयातील बहूतांश शेतक-यांनी तक्रार निवारण कक्षाकडे डीएपी खत उपलब्ध होत नसल्याच्याच तक्रारी केल्या आहेत. तक्रारी नंतर संबंधीत तालुक्यातील कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांना तक्रारी नुसार शेतक-यांच्या आडचणी सोडवण्यासाठी सुचना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक व्ही. के. मिस्कीन यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या