22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात सोयाबीन न उगवल्याने चिंता

जळकोट तालुक्यात सोयाबीन न उगवल्याने चिंता

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील शेतक-यांच्या मागचे काही संकटे कमी होताना दिसून येत नाहीत . तालुक्यातील शेतक-यानी उसने पासने पैसे घेऊन, सोयाबीनची पेरणी केली परंतु अनेक शेतक-यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी आता येऊ लागलेले आहेत. तसेच अनेक शेतक-यांंना दुबार पेरणी करावी लागली आहे. यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे .

जळकोट तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला यामुळे शेतक-यांनी उत्साहामध्ये पेरणी पूर्ण केली काही शेतक-यांंनी ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली तर काही शेतक-यांनी बैलाचा वापर करून पेरणी केली. पेरणी केल्यानंतरही ब-यापैकी पाऊस झाला. शेतक-यांंना यावर्षी तर बियाणे चांगले उगवेल असे वाटत होते काही शेतक -यांची पेरणी साधली बियाणे चांगले उगवले. काही शेतक-यांंची पेरणी वाया गेली. अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. सोयाबीनचे बियाणे खूप महाग झाले आहे. यासोबतच खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत., अशा परिस्थितीत शेतक-याना एकदा पेरणी करणे अवघड जात आहे परंतु काही शेतक-यांंना दुबार पेरणी करावी लागत आहे. पहिल्या पेरणीला जर साठ हजार रुपये खर्च आला असेल तर दुस-या पेरणीलाही तेवढाच खर्च येत आहे. उत्पादन हातात येण्याच्यापूर्वीच शेतक-यांंना पेरणीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे यामुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला आहे.

जळकोट तालुक्यातील अनेक गावातून जळकोट तालुका कृषी विभागामध्ये बियाणे उगविल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीची दखल घेऊन कृषी विभागाने पंचनामा करण्यासाठी एक टीम तयार केली होती उपविभागीय कृषी अधिकारी ट.ीजाधव, शास्त्रज्ञ व्यंकट टोपरोपे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार , पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुडे, अनिल गिते (कृषी मंडळ अधिकारी ) , संबंधित दुकानदार , महाबीज प्रतिनिधी , तसेच संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांनी तक्रार केलेल्या शेतक-याच्या शेतात जाऊन, बियाणे न उगविल्याची पाहणी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या