22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरशंखी गोगलगायच्या प्रादुर्भावाची नुकसान भरपाई मिळणार

शंखी गोगलगायच्या प्रादुर्भावाची नुकसान भरपाई मिळणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
विदर्भात २०१८ मध्ये पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने वेगळा शासनादेश निर्गमित केला होता. तसाच शासनादेश शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी निर्गमित करावा आणि अतिवृष्टीप्रमाणेच संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनासुद्धा मदत द्यावी, अशी मागणी आपण अधिवेशनात केली होती. या मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्याने शेतक-यांना शंखी गोगलगायच्या प्रादुर्भावाची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी रविवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगीतले.

यंदाचे पावसाळी अधिवेशन दि. १७ ते २५ ऑगस्टदरम्यान मुंबईत झाले. अधिवेशनात औसा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून शेतक-यांचे प्रश्न मांडले, असे नमुद करुन आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले, आपल्या भागात अतिवृष्टी खुप कमी भागात झाली. ६५ मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाला तरच त्याला अतिवृष्टी झाली असे ग्रा धरले जाते आणि नूकसान भरपाई मिळते. परंतू, आपल्याकडे संततधार पावसामुळे अतिवृष्टीपेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झाली. त्यातच शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. शंखी गोगलगायींनी लाखो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक फस्त केले. गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची कुठलीही तरतूद एनडीआरएफ, एसडीआरएफ मध्ये नव्हती. त्यामुळे विदर्भातील बोंड अळीच्या धर्तीवर शंखी गोगलगायींनी नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत मिळावी, अशी मागणी केली ती मान्य करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक गावात पर्जन्य मापक बसवणे, स्वातंत्याचा अमृत महोत्सव ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा झाला, त्याच पद्धतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचाही अमृत महोत्सव साजरा व्हावा, आदी मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या सरकारने मान्य केल्याचेही आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या