25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरशहीद जवान सुर्यकांत तेलंगे यांना शोकाकुल निरोप

शहीद जवान सुर्यकांत तेलंगे यांना शोकाकुल निरोप

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंटमधील १५ गार्डस बटालियनचे सेवारत सैनिक हवालदार सुर्यकांत शेषेराव तेलंगे हे कर्तव्य बजावताना दि. २७ जून रोजी दुर्देवी घटनेमध्ये जखमी होऊन १६७ मिल्ट्री हॉस्पीटल पठाणकोट येथे दि. २७ जून रोजी त्यंचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अमृतसर येथून दि. २८ जून रोजी हवाई विमानाने निघून पुणे येथे व तेथून रस्ता मार्गे शिरुर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथे आणण्यात आले आणि अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, त्यानंतर थेरगावच्या नागरिकांच्या उपस्थितीत सुर्यकांत शेषेराव तेलंगे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या चार फैरींची सलामी व मानवंदना देण्यात आली.

शहीद जवान सुर्यकांत शेषेराव तेलंगे यांच्या पश्चात त्यांचे वडील शेषेराव नारायण तेलंगे, त्यांची आई त्रिवेणाबाई शेषेराव तेलंगे, यांच्या पत्नी मनिषा सुर्यंकांत तेलंगे व मुले वेदांत सुर्यकांत तेलंगे, आयुष सुर्यकांत तेलंगे असा त्यांचा परिवार आहे. याप्रसंगी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लिखित शोकसंदेश पाठवला त्यात त्यांनी, तेलंगे सुर्यकांत शेषेराव हे लातूर जिल्ह्याचे सुपूत्र होते.

त्यांच्या जाण्याने लातूरच्या वैभवातील मानाचा तुरा गेल्याचे त्यात म्हटले आहे. आम्ही आपल्या तेलंगे परिवाराच्या दु:खात सहभागी आहोत, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. या शोक संदेशाचे अभय सांळुखे यांनी वाचन केले. यावेळी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी खासदार श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, शिरुर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जटाळे, गटविकास अधिकारी पंकज चव्हाण, कंमाडंट एमआयसी अ‍ॅण्ड सी चे प्रतिनिधी सुभेदार आर. के. यादव, मॅक ग्रुपचे कंमांडर प्रतिनिधी हवालदार जी. आर. एस. रेड्डी तसेच राजवीर सिंग, तसेच जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुखांची तसेच समस्त गावक-यांची यावेळी उपस्थिती होती.

अन् अश्रुंचा बांध फुटला
आपल्या लाडक्या सुपूत्राला शेवटचा निरोप देताना शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांचे वडील शेषेराव तेलंगे, आई त्रिवेणाबाई तेलंगे यांच्यासह त्यांची पत्नी मनिषा तेलंगे व वेदांत व आयुष या मुलांच्या अश्रुषा बांध फुटला. आईच्या हंबरड्याने थेरगावकरांचे -हदय हेलावून गेले. गावच्या सुपूत्राला निरोप देताना अख्खे गाव शोकसागरात बुडाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या