24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरविदेशी मद्याचे बॉक्स जप्तू

विदेशी मद्याचे बॉक्स जप्तू

एकमत ऑनलाईन

लातूर : यरंडी ते सारोळा रोड, ता. औसा या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे वाहतूक कार मधून करण्यात येत होती. सदर घटनेची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना मिळताच त्यांनी मद्याची वाहतूक करणा-या कारचा पाठलाग करुन ३ लाख ४२ हजार ४०० रूपयांची मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यरंडी ते सारोळा रोड, ता. औसा या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे वाहतूक करीत असतांना चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन पकडण्यात आले.

सदर गुन्हयामध्ये ७५० रूपये किमतीचे ८ गोवाराज्य निर्मित विदेशी मद्याचे बॉक्स, एक शेवरोले कंपनीची चारचाकी कार एमएच १२ एनएक्स ८११३, ४०० बुचे असा ३ लाख ४२ हजार ४०० रुपयांचे अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयामध्ये शरद रामराव पवार, ३३ वर्षे, रा. उदगीर, जि. लातूर याला अटक करण्यात आली. सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख, निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, अमोल जाधव, स्वप्नील काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास लातूर दुय्यम निरीक्षक ए. के. शिंदे हे करित आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या