22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरनिलंगा येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ

निलंगा येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ

एकमत ऑनलाईन

निलंगा : येथील लसीकरण केंद्रावर शून्य नियोजनामुळे प्रचंड गोंधळ उडाला असून नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत अधिकारी व पोलिसांसोबत हुज्जत घालण्यात आली. हा प्रकार पोलिसांच्या हाताबाहेर गेल्यानंतर भाजपाचे युवा नेते अरंिवंद पाटील निलंगेकर यांनी घटनास्थळी तात्काळ भेटून नागरिकांची समजूत काढली असता लसीकरणाला सुरुवात झाली.

उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण भरतीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लसीकरणाला अडथळा येत होता. नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी पुढाकार घेऊन दापका वेस येथे नगरपालिकेच्या इमारतीमध्ये १ मे रोजी लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र लसीचा तुटवडा पडत असल्याने अनेकांना रोजच माघारी जावे लागत आहे .तर लसीकरण वितरणात ही प्रचंड गोंधळ होत आहे. यातच मंगळवारी दि ११ मे रोजी कोवीशिल्ड व कोव्हक्सीन शासकीय वेळापत्रकानुसार दिली जाणार होते.

मात्र केंद्रावर प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन तास कामकाज ठप्प झाले .यावेळी तात्काळ नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांना पोलीस बंदोबस्त मागितला होता मात्र तो वेळेत पोहोचू शकला नसल्याने लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले मात्र पोलिसांनीही लसीकरणासाठी आलेल्या नागरिक व ज्येष्ठ नागरिकासोबत हुज्जत घातल्याने गोंधळ वाढला.

ही गर्दी व गोंधळ आटोक्यात येत नसल्याचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांना समजताच त्यांनी केंद्रावर भेट देऊन लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांची समजूत काढली स्वत: रांगा लावल्या प्रत्येकाला विनंती करून लसीकरण करण्यास सुरुवात केली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

उदगीर येथे आरटीपीसीआर प्रयोशाळा मंजूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या