27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeलातूरलातूर, रेणापूर, औसा, तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व

लातूर, रेणापूर, औसा, तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीपैकी ३३८ लोकनियुक्त सरपंच व सदस्यांची निवडणुक झालेली. दि. २० डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. निकालात जिल्ह्यातील विविध गावांत नवखे कारभारी उमेदवार निवडून दिले आहेत. विशेषत: लातूर औसा, रेणापूर तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतीत काँग्रेसचे लोकनियुक्त सरपंच व सदस्य निवडून आलेले आहेत.
विकासरत्न विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे समर्थक बहुतांश ठिकाणी विजयी झाले आहेत. जिल्ह्यात बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचाच झेंडा फडकला आहे, असे एकंदरीत चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील लातूर तालुक्यात ४३, औसा ५८, रेणापूर ३३, अहमदपूर ४१, शिरुर अनंतपाळ ११, देवणी ८, जळकोट १३, निलंगा ६२, उदगीर २५ अशा एकूण ३३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच व सदस्यासाठी मतदान झाले होते त्याची मतमोजणी मंगळवारी झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली.

सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील लोकांनी गर्दी केली होती. गावात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक असल्याने अनेकांनी आपल्या परीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. राज्यात अनेक ठिकाणीं विविध राजकीय नेते आमदार, खासदार स्वत: किंवा पक्षाचे पॅनल ऊभे करतात प्रत्यक्ष सहभाग घेतात मात्र लातूर जिल्ह्यात मात्र स्थानिक गावांतील लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी स्वत: निवडणुकीला सामोरे जातात. निवडून आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचे धोरण लातूर जिल्ह्यातील नेते मंडळीने केले आहे. निवडणुका झाल्या की राजकारण बाजूला सारुन सर्वांना मदत करण्याची लातूर जिल्ह्याची वेगळी ओळख राज्यात आहे ते लोकनेते विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख या नेत्यांनी ग्रामीण भागातील स्थानिक निवडणुकीत कधीही भाग घेतला नाही. मात्र निवडणुकीत निवडून आलेल्या प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. ती आजतागायत कायम आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या