27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरशेतक-यांसाठी काँग्रेसचा एल्गार

शेतक-यांसाठी काँग्रेसचा एल्गार

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतक-यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. शेतक-यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून लातूरात जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. ३ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठा प्रतिसाद मिळाला.

राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काँगे्रसच्या धरणे आंदोलनात काँग्रेस भवन येथे टाकण्यात आलेल्या पेंडालमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मोदी सरकार व कृषी कायद्याच्या विरोधात जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, अ‍ॅड. किरण जाधव, अभय साळुंके, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष राजेसाहेब सवई, शहर जिल्हा सेवादलचे अध्यक्ष सुपर्ण जगताप यानी मनोगत व्यक्त केले. काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे आंदोलन सुरु असताना गांधी चौकात शेतक-यांची निदर्शने सुरु होती. काँग्रेसचे धरणे आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसच्या आंदोलकांनी गांधी चौकात जाऊन शेतक-यांच्या निदर्शनात सहभागी होत शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.

चीनमध्ये अडकलेले भारतीय अधिकारी व कर्मचारी लवकरच मायदेशी परतणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या