23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरकाँग्रेसचे नेते कै. दत्ता मस्के चौकाच्या नामफलकाचे अनावरण

काँग्रेसचे नेते कै. दत्ता मस्के चौकाच्या नामफलकाचे अनावरण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेल्या तीन दशकांपासून निष्ठेने आणि निस्वार्थपणे जनसेवा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लातूर मनपाच्या कर्तव्यदक्ष नगरसेवीका श्रीमती वर्षाताई दत्ता मस्के यांचे पती स्व. दत्ता मस्के यांच्या नावाने चौकाच्या नामफलकाची निर्मीती करुन लातूर मनपाचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले.

शहरातील नांदेड रोडवर असलेल्या सिद्धार्थ सोसायटी व संत गोरोबा सोसायटीकडे जाणा-या रस्त्यालगत असलेल्या चौकास स्व. दत्ता मस्के यांचे नाव देण्याचा मनपाच्या स्थायी समितीने ठराव पारीत करुन सदरील चौकाचे नामकरण करून अनावरण केल्याने काँग्रेस पक्षाच्या एका सच्चा कार्यकर्त्याचा लातूर मनपाने सन्मान केल्याचे समाधान परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. दि. २० मे २०२२ रोजी स्व. दत्ता मस्के यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून लातूर मनपाने निर्माण केलेल्या चौकाच्या नामफलकाने खरी आदरांजली अर्पण केली आहे हे विशेष.

सदरील समारंभास नगरसेविका श्रीमती वर्षाताई मस्के, रघुनाथ मदने, मनपाचे क्षेत्रिय अधिकारी समाधान सुर्यवंशी, धर्माधिकारी, बालाजी गवळी, ग्राम परिसर विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी बिबराळे, सचिव संभाजी मस्के, स्वामी, मंगेश वैरागे, लक्ष्मण मस्के, शशीकांत गवळी, विनोद मस्के, योगेश पवार, बळीराम माने, दक्ष मस्के, अमोल वाघमारे, अथर्व मस्के आदीसह प्रभागातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या