24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरजळकोट तहसीलवर काँग्रेसचा मोर्चा

जळकोट तहसीलवर काँग्रेसचा मोर्चा

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यात एक ते दीड वर्षापासून कमी दाबाने विजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतक-यांंना पाणी उपलब्ध असूनही पिकांना पाणी देता येत नाही तसेच ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठाही सुरळीत करता येत नाही. यासह अन्य विविध मागण्यासाठी निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने जळकोट काँग्रेस तालुक्याच्यावतीने तालुकाध्यक्ष मारुती पांडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जळकोट तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना योग्य प्रमाणात नियमाप्रमाणे विज उपलब्ध करुन दयावे , जळकोट येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करावे , पाण्याआभावी वाळून गेलेल्या सोयाबीन व ईतर पिकांची नुकसान भरपाई दयावी , १०० टक्के पिकविमा तत्काळ लागू करावा, शेतक-यांना रब्बीच्या पेरणीसाठी अर्थसाहाय्य करावे , शेतीचे सरसकट पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, शेतमजुरांना म.ग्रा.रो.ह.यो.चे कामे उपलब्ध करुन दयावी, कोळनूर. जळकोट .व वांजरवांडा. येथी ३३ के व्ही फिडरची क्षमता वाढवून .विजपूरवठा सुरळीत. करावा , जिल्हा वार्षीक योजनेत मंजूर आसलेले तालुक्यातील सर्व गावातील विजे संदर्भातील सर्व कामे कंञाटदाराकडून विहीत वेळेत पूर्ण करुन घ्यावे व काम करण्यास विलंब व दिरंगाई करणा-या कञांटदारावर नियमानुसार कडक कार्यवाही करावी. या मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार जी. एल. खरात यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शेतक-यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यानी वाळलेले सोयाबीन हातात घेऊन आंदोलन केले .

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मारोती पांडे, काँगेसचे जेष्ठ नेते बाबुराव जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सरपंच मेहताब बेग, माजी सभापती बालाजी ताकबीडे, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष नूर पठाण, सरपंच शिरिष चव्हाण, विश्वनाथ इंद्राळे, बाबुराव पाटील, किरण पवार, दिलीप पांचाळ, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष धनराज दळवे, मागासवर्गीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे, तानाजी सोनटक्केयांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या