जळकोट : ओमकार सोनटक्के
नगरपंचायतीच्या सतरा जागेसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडली या मतमोजणीत भाजपाचा सुपडा साफ झाला असून, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना विकास आघाडीला तब्बल १३ जागी विजय मिळाला आहे तर या खालोखाल तीन जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत . शहरांमधील मधील ७, ८, व ३ या तीन प्रभागात शिटी ने कमाल केली आहे तर फक्त एका जागेवर भाजपाला समाधान मानावे लागले आहे .
जळकोट शहरामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून काँग्रेसचे संग्राम गंगाधर नामवाड हे २८७ मते घेऊन विजयी झाले त्यांनी भाजपाच्या दत्तात्रेय नामवाड यांचा २२४ मतांनी पराभव केला.प्रभाग क्रमांक दोन मधून मीनाक्षी ओमकार धूळ शेटे यांनी १७३ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी अपक्ष रजीयाबी लाटवाले यांचा ४४ मतांनी पराभव केला.प्रभाग क्रमांक तीनमधून अपक्ष उमेदवार धोंडूतात्या गुणवंतराव पाटील हे २२९ मध्ये घेऊन विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादीचे मुमताज शेख यांचा ८४ मतांनी पराभव केला , वार्ड क्रमांक चार च्या उमेदवार काँग्रेसचे वर्षा सचिन सिद्धेश्वरे या १५८ मते घेऊन विजयी झाल्या याठिकाणी भाजपाचे तयबाबी सय्यद यांचा ७१ मतांनी पराभव झाला.
प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपाच्या रेखा विवेकानंद देवशेटे या ३०३ मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादीचे गंगाबाई डांगे यांचा १९० मतांनी पराभव केला . वार्ड क्रमांक सहा मधून शिवसेनेचे शिवंिलग नागोराव धूळशेटे हे १८७ मते घेऊन विजयी झाले त्यांनी भाजपाचे किशन धूळशेटे यांचा ४३ मतांनी पराभव केला वार्ड क्रमांक सात मधून अपक्ष उमेदवार लक्ष््मीबाई मंगनाळे या ३५४ मते घेऊन विजयी झाल्या. या ठिकाणी काँग्रेसच्या वहिदा मोमीन या १५० मतांनी पराभूत झाल्या , वार्ड क्रमांक आठ मधून अपक्ष उमेदवार संदीप दिगंबर डांगे १०७ मते घेऊन विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादीचे शिवानंद देशमुख यांचा ४९ मतांनी पराभव केला , वार्ड क्रमांक ९ मधून काँग्रेसचे गोपालकृष्ण गंगाधर गबाळे हे १४४ मते घेऊन विजयी झाले त्यांनी अपक्ष उमेदवार बशीर शेख यांचा ७६ मतांनी पराभव केला , प्रभाग क्रमांक १० मधून बाबुमिया लाटवाले हे २२८ मते घेऊन विजयी झाल.े या ठिकाणी निलाबाई गायकवाड यांचा १०६ मतांनी पराभव झाला .
प्रभाग क्रमांक ११ मधून काँग्रेसच्या अश्विनी महेश धूळशेटे या १२८ मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी शालुबाई गायकवाड यांचा ५३ मतांनी पराभव केला , प्रभाग क्रमांक बारामधून राष्ट्रवादीच्या सुरेखा शेषराव गवळी या २६५ मते घेऊन विजयी झाल्या , त्यांनी अपक्ष उमेदवार मायादेवी कांबळे यांचा १०९ मतांनी पराभव केला , वार्ड क्रमांक १३ मधून राष्ट्रवादीचे विनायक डांगे यांनी १८६ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी अपक्ष उमेदवार अमोल गुप्ते यांचा ६३ मतांनी पराभव केला , प्रभाग क्रमांक १४ मधून काँग्रेसच्या संगीता नागोराव धूळशेटे या १६१ मते घेऊन विजयी झाल्या , त्यांनी भाजपाच्या सविता शिवशंकर धूळशेटे यांचा पराभव केला , वार्ड क्रमांक पंधरा मधून काँग्रेसचे मन्मथ किडे यांनी २८१ मते घेत विजय संपादन केला
याठिकाणी भाजपाच्या सविता किशन धूळशेटे यांचा १०८ मतांनी पराभव केला , प्रभाग क्रमांक १०६ मधून राष्ट्रवादीच्या प्रभावती चंद्रकांत कांबळे या ३७० मध्ये घेऊन विजयी झाल्या त्यांनी भाजपाच्या सुमन तोगरे यांचा तब्बल ३०० मतांनी पराभव केला तर प्रभाग क्रमांक १७ मधून शिवसेनेच्या सुमनबाई त्र्यंबक देशमुख या १८९ मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी एमआयएमच्या जाधव गीन्यानबाई यांचा ५५ मतांनी पराभव केला . जळकोट तहसीलमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली , निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी काम पाहिले. तर सहाय्यक म्हणून तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी काम पाहिले. याप्रसंगी मुख्याधिकारी राठोड, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, अव्वल कारकून थोटे, नगरपंचायतीचे पिनाटे, आर पी शेख , अलीम शहरवाले , यांनी निवडणूक विभागाचे काम पाहिले. मतमोजणी प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, साहेब पोलीस निरीक्षक परकोटे, नरवटे यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता .