रेणापूर : आगामी रेणापूर नगरपंचायत निवडणूकीत सर्वांना सोबत घेऊन नगरपंचायतीवर कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी आतापासून प्रयत्न करावयाचा आहे. त्यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक आहे काँग्रेस पक्ष सर्व समाजातील काँगेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांंना आगामी निवडणुकीसाठी प्राधान्य देणार असून त्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे प्रतिपादन रेणापूर नगरपंचायतीचे प्रभारी पृथ्वीराज सिरसाट यांनी रविवारी येथे बोलताना व्यक्त केले.
नगरपंचायत निवडणूकीसाठी रेणापुर शहरातील कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची सुसंवाद बैठक रविवार दि. ३ रोजी येथील रेणुका देवी मंदिर सभागृहात बैठक आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी शहराध्यक्ष तुकाराम कोल्हे हे होते. तर प्रमुरव पाहुणे म्हणून नगरपंचायतीचे प्रभारी पृथ्वीराज सिरसाट व सहप्रभारी अनुप शेळके व कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सहप्रभारी अनुप शेळके यानी देशमुख परिवारामुळेच लातुर जिल्ह्याचा कायापालट झाला. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावांचा विकास आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. तर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. जाधव यांनी नगरपंचायतीवर कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकावयाचा आहे. त्यासाठी वेळोवेळी सूचना कराव्यात त्या सूचनाची दखल प्रभारी घेऊन वरिष्ठापर्यंत कळवतील.
यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांंनी नगरपंचायतीची प्रभागनिहाय प्रत्येकांचे म्हणणे ऐकून घेऊन नगरपंचायत निवडणूकीत उमेदवारी देत असताना त्या त्या प्रभागातील उमेदवाराला प्राधान्य द्यावे. ऐन वेळी उमेदवारी डावल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम नर्मिाण होतो अशा सूचना केल्या त्या सूचना पक्ष निरीक्षक पृथ्वीराज शिरसाठ अनुप शेळके यांनी ऐकून घेतल्या वरष्ठि पातळीवर त्या पाठवण्यात येतील असे सांगीतले आहे काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक मंत्री अमीत विलासराव देशमुख, तालुक्याचे आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढविण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी आतापासून कामाला लागावे लोकांत जाऊन चर्चा करावी पक्षश्रेष्ठी हा निर्णय अंतिम घेणार आहे असे यावेळी पृथ्वीराज शिरसाठ यांनी सांगितले.
यावेळी संगायो समितीचे अध्यक्ष गोंिवंद पाटील, माजी सरपंच म. श. हालकुडे, अशोक राजे, माजी चेअरमन बाबुराव जाधव, व्हाईस चेअरमन महादेव चव्हाण, महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा पुजा विशाल इगे, शहराध्यक्षा निर्मला गायकवाड, भारतबाई राठोड, माजी गटनेते पद्म पाटील, पंडीत कातळे, प्रदिप मिरजकर, रमेश बोने, अँड. प्रशांत अकनगिरे, विठ्ठल, कटके, दासू राठोड, बाबामियॉ सय्यद, खैसर अली सय्यद, ब्रम्हानंद इगे, दादाराव कांबळे, भुषण पनुरे, उमेश सोमानी, अनिल पवार, रामंिलग जोगदंड, गणेश सौदागर, विजयकुमार काळे, विजयकुमार एकुरके, पाशामियॉ शेख, मनोहर व्यवहारे, नागनाथ दळवी, राम पाटील, बळी कुरे, सचिन इगे, प्रदिप काळे, सतीश चव्हाण, सुजित वंगाटे, दयानंद राठोड, विजय राठोड, वठ्ठिल राठोड, गोंिवद आडे, रोहित गिरी, शिवाजी रणदिवे, बाळासाहेब पाटील, यांच्यासह १७ प्रभागातील कॉग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.