22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरकाँग्रेस पक्षाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारींची नियुक्ती

काँग्रेस पक्षाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारींची नियुक्ती

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परीषदाबरोबर लातूर जिल्हा परीषद निवडणूकीतही भरीव यश मिळवीणेसाठी काँग्रेस पक्षाने पूर्वतयारी सुरु केली आहे. पक्षबांधणी बरोबरच कार्यकर्ते आणि जनतेसोबत संवाद साधून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज्याच्या माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेवरुन विधानसभा मतदारसंघ निहाय प्रभारी नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी दिली.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी प्रसिध्दरस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर पंचायत प्रमाणेच जिल्ह्यातील नगर परीषद, जिल्हा परीषद आणि महानगरपालीका निवडणूकीमध्ये भरीव यश मिळवण्याच्यादृष्टीने काँग्रेस पक्षाने तयारी सरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर नगरपरीषद निवडणूकीसाठी पक्षाच्या वतीने प्रभारीची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत त्या-त्या नगरपरीषद निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येत आहे. या दरम्यान जिल्हा परीषद निवडणूकही होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार लातूर जिल्ह्यातील उदगीर-जळकोटसाठी रविंद्र काळे, लातूर शहर मतदारसंघातील ग्रामिण भागासाठी दगडूसाहेब पडीले, लातूर ग्रामिण मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून नारायणराव लोखंडे तर सहप्रभारी म्हणून अजित माने, निलंगा मतदारसंघासाठी राजेश्वर निटूरे, अहमदपूर-चाकूरसाठी विजय देशमुख, औसा मतदासंघासाठी सर्जेराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगर पंचायत निवडणूकही लवकरच होण्याची शक्यता आहे त्यामूळे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभारी म्हणून पृथ्वीराज सिरसाट तर सहप्रभारी म्हणून अनुप शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले प्रभारी स्थानीक प्रातळीवर जाऊन तेथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात काम करणा-या संघटना यांचे प्रतिनिधी, नागरीक यांच्या बरोबर चर्चा करुन पक्षाचे उमेदवार ठरवण्यासाठी निवडणूकीतील रणनीती ठरवण्यासाठी पक्षनेृतृत्वाला अहवाल सादर करतील, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या