24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरदेशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसचा मोठा वाटा

देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसचा मोठा वाटा

एकमत ऑनलाईन

औसा : देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे मोठे योगदान असून त्यात गांधी कुटुंबांनी देश एक संघ ठेवण्यासाठी बलिदान दिले. देश स्वातंत्र्य झाल्यावर ज्या पद्घतीने देशात जी विकासाची भरारी उभी राहिली त्यात काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधीपासून मनमोहनंिसंह यांच्या पर्यंत सर्व काँग्रेसच्या सरकारने देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला हे वास्तव चित्र आहे काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिका-यांनी लोकापर्यंत जावून सांगितले पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रा.डॉ बी.व्ही. मोतीपवळे यांनी केले.

औसा तालुक्यातील ंिलंबाळा दाऊ, दापेगाव, नागरसोगा येथून देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी प्रा. डॉ बी. व्ही. मोतीपवळे, यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. यावेळी रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळूंके, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शाम भोसले, लातूर मनपाचे माजी नगरसेवक तथा औशाचे पक्ष निरीक्षक समद पटेल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तथा औशाच्या माजी नगरसेविका मंजूषा हजारे, सौ.सई पृथ्वीराज गोरे, माजी नगरसेवक अंगद कांबळे, सदानंद शेट्टे हे उपस्थित होते.

प्रा. मोतीपवळे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गोरगरीब, वंचित, सर्वसामान्याला आधार देण्याचे काम पक्ष नेतृत्वाने केले. महिला सुरक्षा कायदा, अन्न सुरक्षा योजना राबवून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात लोकनेते विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याचा विकास केला. साखर उद्योग सुरू केले. त्यात मांजरा साखर परिवाराने जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यातील उसउत्पादकांना अधिक दर देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले आहे मात्र सध्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून केला जात आहे. देशासाठी त्याग करणारे गांधी घराणे असून त्यांची बरोबरी कुणालाही करता येणार नाही.असे म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, पदयात्रा समन्वयक प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी औसा तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, जिल्हा काँग्रेसचे फ्रंट चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, औसा शहर काँग्रेस अध्यक्ष शकील शेख, प्रवीण पाटील, प्रा एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण रमेश सूर्यवंशी शरद देशमुख, हरिराम कुलकर्णी, विपुल हाके, दिपक राठोड, रामराजे काळे, बाळासाहेब करमुडे, उदयंिसंह देशमुख, राजेन्द्र भोसले, अमरंिसंह भोसले, शाम भोसले, सचिन पाटील, पांडुरंग चेवले, कमलाकर अनंतवाड, विजय कदम, विठ्ठल पांचाळ, प्रकाश पाटील, बाळासाहेब देशमुख, नामदेव माने,अजीत शिंदे, अप्पासाहेब घाडगे आदी मान्यवर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन, आभार प्रदर्शन प्रा.डॉ सुधीर पोतदार यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या