23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरभारताच्या प्रगतीत काँग्रेसचा मोलाचा वाटा

भारताच्या प्रगतीत काँग्रेसचा मोलाचा वाटा

एकमत ऑनलाईन

रेणापूर : देश स्वातंत्रपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही जवळपास ४५ वर्ष काँग्रेसच्या हातात सरकार असताना देशात कृषि, उद्योग, दळणवळण, आरोग्य, संगणक, शैक्षणीक विद्यापीठे उभी केली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुपासून ते मनमोहनंिसंग यांच्या नेतृत्वाखाली देशाला सर्वागीण विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे कार्य काँग्रेस पक्षाने केले आहे. त्यामुळे देशाच्या जडणघडणीत काँग्रेस पक्षाचा मोलाचा वाटा राहिला आहे. हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या पदयात्रेतून प्रयत्न झालेला आहे सर्वागीण विकासासाठी आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे तरुणांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले.

रेणापूर तालुक्यांतील पोहरेगाव येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या आझादी गौरव पायी पदयात्रा समारोप शनिवारी दि. १३ रोजी सायंकाळीं करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, पदयात्रा समन्वयक प्रविण पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा काँग्रेसचे विविध विभागांचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, रमेश सूर्यवंशी, हरीराम कुलकर्णी, प्रविण सूर्यवंशी, शरद देशमुख, विपुल हाके, लालासाहेब चव्हाण हे उपस्थित होत.े

आमदार देशमुख म्हणाले की, देशात सर्वाधिक पंतप्रधान कोंग्रेसचे नेते राहिले आहेत. त्यांनी केलेल्या कार्यामुळे देश भक्कम उभा राहिला आहे. देशात पहिल्यांदा संगणक तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणले. आहे म्हणून चांगल्या कामासाठी काँग्रेस पक्षासाठी तरुणांनी काम करावे. गोरगरीब वंचितांसाठी झटणारा काँग्रेस पक्ष नव्हे तर चळवळ आहे. सध्या महागाई वाढली आहे यावर न बोलता खोटे आरोप करीत काही विरोधक चांगल्या प्रकारे चालणा-या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे आता खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार धीरज देशमुख यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी माजी आमदार अ‍ॅड त्र्यंबक भिसे, यशवंतराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे पदयात्रा समन्वयक प्रविण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक रेणा सहकारी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी तर आभार लातूर जिल्हा मध्यवर्ति बॅकेचे उपाध्यक्ष तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या