24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरकेंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात काँग्रेस उतरली रस्त्यावर

केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात काँग्रेस उतरली रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात लातूर शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करुन भाजप सरकारचा जोरदार विरोध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

देशातील जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला सातत्याने प्रश्न विचारणारे, सर्वसामान्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणारे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांची ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. केंद्र सरकारच्या या जाचक निर्णयाचा विरोध करण्यासाठी शुक्रवार दि. १७ जुन रोजी हे आंदोलन करण्यात आले. सोनिया गांधी जी, हम आपके साथ हैं, राहुल गांधी जी, हम आपके साथ हैं… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी आमदार धिरज देशमुख म्हणाले, जेव्हा जेव्हा देश संकटात होता, तेव्हा तेव्हा काँग्रेस लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी धावून आली आहे. आज महागाई, बेरोजगारी, देशाची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे भारत संकटात आहे. म्हणून काँग्रेस पक्ष आणि खासदार राहुल गांधी आवाज उठवत आहेत. रस्त्यावर उतरत आहेत. देशासमोरील खरे प्रश्न ते लोकांना सांगत आहेत. पण, कटकारस्थान करुन, ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करुन हा आवाज दाबण्याचे आणि लोकांचे लक्ष देशासमोरील ख-या प्रश्नांपासून बाजूला घेऊन जाण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध
करतो.

या आंदोलनात माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सूर्यशिला मोरे, लातूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. डॉ. स्मिता खानापूरे, प्रमोद जाधव, लक्ष्मण कांबळे, रविंद्र काळे, सर्जेराव मोरे, मोहन माने, विद्या पाटील, सपना किसवे, उषा कांबळे, कमलबाई मिटकरी, केशरबाई महापुरे, रमेश सूर्यवंशी, मारोती पांडे, अनंतराव देशमुख, सुरेश चव्हाण, नरेश पवार, इम्रान सय्यद, दगडूसाहेब पडीले, सचिन दाताळ, अनुप शेळके, सुधीर पोतदार, नारायण लोखंडे, प्रभाकर केंद्रे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, प्रा. सुधीर अनवले, नागसेन कामेगावकर, सिकंदर पटेल, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, अ‍ॅड. फारुक शेख, गोविंद पाटील, राजेसाहेब सवई, गोविंद बोराडे, प्रवीण सूर्यवंशी, सुभाष घोडके, अनिल पाटील, बादल शेख, कल्याण पाटील, अमोल भिसे, हणमंत पवार, मोहन सूरवसे, मतीनअली सय्यद, रघूनाथ मदने, व्यंकटेश पुरी, दत्तोपंत सूर्यवंशी, पांडुरंग वीर, संजय ओव्हळ, कमलाकर अनंतवाड, बाळकृष्ण माने, अ‍ॅड. देविदास बोरुळे, ज्ञानोबा गवळे, विलास पाटील, दिनेश नवगिरे, इसरार सगरे सुतेज माने, अकबर माडे, विश्वास देशमुख, मधुकर शिंदे, विश्वनाथ कागले, प्रदीप काळे, सचिन इगे, राज क्षीरसागर, राजू गवळी, चंद्रकांत धायगुडे, शंकर सगर, प्रमोद जोशी, शिवाजी कांबळे, बालाजी मनदुमले, प्रदीप माळी, गुरुनाथ काळे, रामेश्वर हालके यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
पदाधिकारी, नगरसेवक, लातूर जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्ह्यातील
आघाडी संघटना, विभाग व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या