25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरशहर महानगरपालिकेमार्फत कंटेनर सर्वेक्षण

शहर महानगरपालिकेमार्फत कंटेनर सर्वेक्षण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सध्­या पावसाळयाचे दिवस असून डास उत्­पत्­तीसाठी पोषक वातावरण असल्­याने त्­यामुळे डेंग्­यु, चिकुनगुन्­या, हिवताप आजाराचा प्रार्दूभाव वाढण्­याची शक्­यता नाकारता येत नाही. आरोग्­य कर्मचारी व आशा स्­वयंसेविका यांचेमार्फत विविध भागात कंटेनर सर्वेक्षण करण्­यात येत आहे. तथापि डेंग्­यु ताप प्रतिबंधात्­मक व नियंत्रणात्­मक उपाययोजने अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्­या वतीने आरोग्­य कर्मचारी (पुरुष /स्­त्री), आशा स्­वयंसेविकामार्फत घरोघरी जावून सांडपाण्­याच्­या टाक्­यांतील पाणीसाठ्यात डासअळींची उत्­पत्ती झाली आहे का याची तपासणी करुन आरोग्­य शिक्षण व आवश्­यकतेनूसार अ‍ॅबेट टाकण्­याची कार्यवाही करण्­यात येणार आहे.

सर्व नागरीकांनी साठवलेले पाणी उघडे न ठेवता घट्ट झाकणाने सर्व पाणी टाक्­या झाकून ठेवाव्­यात. झाकण असलेल्­याच टाक्­यांचा वापर करावा. फुटक्­या व झाकता न येवू शकणा-या टाक्­या वापरु नयेत व त्­याच्­या विल्­हेवाटीसाठी घंटागाडीकडे द्याव्­यात. टाक्­यांना झाकणे नसल्­यास झाकणे बसवूण घ्­यावीत. निरुपयोगी, भंगार साहित्­य छतावर, अंगणात न ठेवता ते घंटागाडी कडे दयावे, नळाखाली, परीसरात खड्डे असल्­यास बुजवून घ्­यावेत. साचलेले पाणीकाढून टाकावेकिंवा साचलेल्­या पाण्­यात खराब ऑईल, तेल टाकावे. फुलदाणीतील पाणी नियमितपणे बदलावे. कुलर व फ्रिजच्­या डिफ्रॉट प्­लेटमधील पाणी नियमीत बदलावे. शरीर झाकण्­यासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत. डास चावू नयेत म्­हणून लहान मुला-मुलींना लांब बाह्यांचे शर्ट व पॅन्­ट, सलवार व कमीज, लेगीन्­स या सारख्­या कपडयांचा वापर करावा.

जलजन्य आजार व साथरोग नियंत्रणासाठी महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर असून त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महानरगपालिकेची आरोग्य यंत्रणा, आशा स्­वयंसेविकामार्फत घरोघरी जावून सांडपाण्­याच्­या टाक्­यांतील पाणीसाठ्यात डासअळींची उत्­पत्ती झाली आहे का याची तपासणी करीत आहे. कंटेनर सर्वेक्षण केला जात आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रश्.ाासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या