लातूर : लातूर तालुक्यातील चांडेश्वर व भातांगळी येथील रूग्ण बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या दोन्ही गावात कंटेंटमेन्ट झोन करण्यात आले आहेत़ सदर गावांची उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसिलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ अशोक सारडा यांनी गुरूवारी पाहणी करून नागरीकांना व कर्मचा-यांना आरोग्याच्या संदर्भाने सुचना केल्या आहेत.
लातूर तालुक्यात आज पर्यंत १४ गावांपैकी बोरगाव काळे येथे २ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले़ तसेच महाराणा प्रतापनगर १ रूग्ण, कासारगाव २ रूग्ण, भिसेवाघोली १ रूग्ण, बाभळगाव ४ रूग्ण, पाखर सांगवी १ रूग्ण, ममदापूर ६ रूग्ण, खाडगाव १ रूग्ण, साई २ रूग्ण, आर्वी १ रूग्ण, चांडेश्वर १ रूग्ण, भातांगळी १ रूग्ण, मसला १ रूग्ण, खंडापूर येथील सीआरपीएफ कँम्प मध्ये ३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत़ आज पर्यत १४ गावात २७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले़ त्यापैकी १२ पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ १४ जणांना यशस्वी उपचार करून घरी
पाठवले आहे़ तर साई येथील १ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
लातूर तालुक्यात सध्या चांडेश्वर, भातांगळी, ममदापूर, खाडगाव, साई, कासारगाव, साईरोड या सात गावात सध्या कंटेंटमेन्ट झोन करण्यात आले आहेत़ या ठिकाणी नागरीकांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सुचना करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ अशोक सारडा यांनी दिली.
Read More रांजणीचा प्लान्ट बंद करण्याचा आदेश