34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूर‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेत योगदान द्या

‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेत योगदान द्या

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या गतीने होतो आहे. दर दिवसाला २० टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. आणखी किती दिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल हे कोणीच सांगु शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे सर्वांचे कर्तव्य आहे. ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेत सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी फेसबुक लाईव्हमध्ये केले.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले, मार्चमध्ये लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये अचानक मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. एका दिवसात १०० नागरिकांची चाचणी केल्यास त्यातील २० नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. दर दिवसाला कोरोनाची टक्केवारी २० पर्यंत गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या सूचनांसह मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात धुणे, लस घेणे या गोष्टी करणे आवश्यक आहेत.

यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, जिल्ह्यात १४४ कलम जारी आहे.त्यामुळे सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये. शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये रुग्णालय, औषधी दुकाने, आरोग्य सेवेशी संबंधीत सर्व यंत्रणा, एस. टी. बस वाहतूक, सार्वजनिक कामे, कृषी संबंधी सुविधा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने निर्धारीत केलेल्या अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा बंद राहातील. उद्याने, मैदाने, मनोरंजनाचे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, आठवडी बाजार बंद राहातील. विना मास्क आढळल्यास ५०० रुपये दंड केला जाणार आहे. सर्व आस्थापनांतील मालक, कर्मचा-यांनी येत्या १५ दिवसांत कोविड निगेटिव्ह अहवाल देणे आवश्यक आहे. अन्यथा १० हजार रुपयांपर्यंत दंड आणि वारंवार अशी चुक झाल्यास कोरोना महामारी संंपेपर्यंत परवाना रद्द केला जाणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहातील. फक्त पार्सल किंवा होम डिलेव्हरी देता येणार आहे. शनिवार आणि रविवारी पार्सलसेवाही बंद राहील. शाळा, महाविद्यालये पूर्णत: बंद राहातील. सलून बंद असतील, पुर्व नियोजित लग्न समारंभ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत स्वगृही करावे, अंत्यविधी २० व्यक्तींच्या उपस्थितीत करावा. उत्पादन क्षेत्राशी निगडीत कारखान्यातील कर्मचा-यांचे लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. कारखान्यातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यास वैद्यकीय रजा मंजूर करावी. रजेचे वेतन द्यावे व त्यास कामावरुन कमी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.

खाजगी हॉस्पिटलसाठी शासकीय नोडल अधिकारी
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत १८५ आसीयू आणि १२०० ऑक्सिजन बेडस् आहेत. ऑक्सिजन, औषधे, बेडस् मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलमधील बेडस्, औषधीसाठा याची पाहणी करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलसाठी शासकीय नोडल अधिका-यांची नेमणुक करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले.

होम आयसोलेशनचा दुरुपयोग केल्यास दंड
जिल्ह्यातील सुमारे ४ हजार व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आल्याने त्यासंबंधी धडक मोहीम राबविली. ग्रामीण भागात एक-दोन ठिकाणी चुकीचे प्रकार घडले परंतू, शहरी भागात अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. होम आयसोलेशनचा दुरुपयोग केल्यास अशा रुग्णावर दंडात्मक कारवाई करुन त्यास कोरोना केअर सेंटरमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिला आहे.

 

न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान – नवाब मलिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या