24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरस्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान

स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व स्वातंत्र प्राप्ती नंतर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू ते डॉ. मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने दिलेले योगदान जडणघडणीत मोलाचा वाटा राहिलेला आहे. हे वास्तव्य चित्र जनते पर्यंत आज पोहोचवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या आझादी गौरव पायी पदयात्रेचा शुभारंभ अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे होते. यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, पदयात्रा समन्वयक प्रवीण पाटील, जिल्हा महीला काँग्रेसच्या अध्यक्षा सूर्यशिला मोरे, काँग्रेसच्या विविध फ्रंटचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, एकनाथ पाटील, हरीराम कुलकर्णी, शरद देशमुख, प्रवीण सुर्यवशी, सिरजोद्दिन जहागीरदार, सुरेaश चव्हाण, रमेश सूर्यवंशी, शिलाताई पाटील, अँड. हेमंत पाटील, विलास पाटील उपस्थित होते

देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा काँग्रेस नेत्यांनी जसा उचलला त्याच धर्तीवर महाराष्ट्रात व लातूर जिल्ह्यात लोकनेते विलासराव देशमुख यांनी मोठया प्रमाणावर विकास केला. पूर्वी आपला मागास भाग म्हणून ओळखले जायचे मात्र गेल्या ४० वर्षात आपल्या भागाचा कायापालट झाला आहे, हे काम लोकनेते विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे यांनी केले आहे. साठवण तलाव निर्माण झाले, साखर कारखाने, एमआयडीसी हे सर्व काँग्रेसच्या काळात नेतृत्वाने ऊभे केले आहे. त्यामूळे जिल्ह्यांत आज सगळीकडे चोहीकडे सुख समृध्दी दिसत असल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, जिल्हा बँक, साखर कारखाने चांगले चालत आहेत. त्यामुळे आपले मूल परदेशात शिक्षण घेवून उच्च पदावर कार्यरत आहेत हे केवळ काँग्रेसच्या नेत्यांमुळे शक्य झाले आहे हे वास्तव्य चित्र दिसून येत आहे.

देशाच्या राज्याच्या जडणघडणीत काँग्रेसच्या नेते मंडळी यांचा सहभाग*
यावेळी उटगे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे पासून नेहरु ते मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाला औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विकासाची ब्ल्यू प्रिंट काँग्रेसच्या सरकारने दिलेले आहे. सध्या सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने महागाई शेतक-यांच्या धोरणाबद्दल चुकीचे निर्णय घेवून आर्थिक पिळवणूक करण्याचे काम सुरू केले आहे हे थांबवण्याची गरज आहे.

या पदयात्रेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, सहदेव मस्के, राजकुमार पाटील, पपू शेख, सलीम तांबोळी, निलेश देशमुख, शामराव सुर्यवंशी, ललिता झिले, सांभ महाजन, विकास महाजन, चंद्रकांत मद्दे, राम घोटे, सरपंच प्रवीण जाधव, दीपक जाधव, दिनकर पाटील, उपसरपंच नाथराव रोकडे, अनिल चव्हाण, करमुडे, शिवाजी चव्हाण, गोपाळ चव्हाण, सुवर्णा रोकडे, अमर वलां डे, रत्नदीप आजनिकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या