31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home लातूर मकर संक्रांतीच्या गोडव्यावर कोरोना, बर्ड फ्लूचे सावट

मकर संक्रांतीच्या गोडव्यावर कोरोना, बर्ड फ्लूचे सावट

एकमत ऑनलाईन

लातूर : दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ८.१५ ते सायंकाळी ४.१५ यावेळेत मकरसंक्रांतीचा पर्वकाळ आहे. मकरसंक्रांतीसाठी लागणारे चुडे, सुगडे, हळदी-कुंकू आणि विविध प्रकारचे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत. परंतु, यंदा कोरोना आणि आता बर्ड फ्लूमुळे बाजारपेठेत म्हणावी अशी गर्दी दिसत नाही., त्यातच यंदा किंचित महागाईमुळेही ग्राहकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी दर्शवेळा अमावस्यामुळे तर संपूर्ण बाजारपेठत शुकशुकाट होता.

मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवाचे वाण व भेटवस्तू सुवासिनींना देतात. बाजारपेठेत तांब्याचे तांबुले, चमचे, पळी, छोटे आरसे, जोडवे, घरगुती उपयोगी वस्तू, मेहंदी कोन, सिंदूर, काजळ, रुमाल, छोटे डबे, अशा नानाविध वस्तू वाणासाठी उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढ झाल्याने ग्राहकांत तितकासा उत्साह दिसून येत नाही. त्यातच गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव राहिल्याने नागरिकांसमोर आर्थिकसह अनेक अडचणी आहेत. त्यातच आता बर्ड फ्लूने डोकेवर काढले आहे. कोरोनाने एकीकडे आर्थिक घडी विसकटून टाकली.

आता कुठे कोरोनाच्या सावटातून मुक्त होत असताना बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भारतीय संस्कृतीत अनेक सण पारंपारीक पद्धतीने साजरे केले जातात. मकरसंक्रातीला तिळगुळ, हलव्याची गोडी असते. परंतु, यंदा महागाई, कोरोना आणि बर्ड फ्लूने मकरसंक्रांतीच्या गोडीवर विर्जन टाकल्याचे दिसून येत आहे.

मकरसंक्रांतीच्या वाणाचे विविध प्रकार बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. चुड्यांच्या किंमतीत काहीशी वाढ झालेली आहे. तिळवडी, हलवा यांचेही भाव चार-पाच टक्यांनी वाढले आहेत. स्नेह वृद्धिंगत करणारा मकरसंक्रांत हा महत्वाचा सण आहे.भारतीय संस्कृतीत या सणाला वेगळे महत्व आहे. याच दिवशी सूर्याचे उत्तरायण सूरु होते. म्हणजेच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.

दिवस मोठा आणि रात्र लहान होण्यास सुरुवात होते. थंडी जाऊन उन्हाळ्याची चाहुल लागायला सूरुवात होते. कधी हा सण १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येतो. यंदा सूर्य १४ जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करीत असल्याने मकरसंक्रांती याच दिवशी आहे. हा सण तीन दिवस साजरा केला जातो.

मनपा निवडणुकांसाठी टीम तयार करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या