34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरकोरोनामुळे ग्रामीण भागांमध्ये भीतीचे वातावरण

कोरोनामुळे ग्रामीण भागांमध्ये भीतीचे वातावरण

एकमत ऑनलाईन

जळकोट : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोणाची दुसरी लाट आली आहे, जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात दुस-यादा कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे , तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर गेलेली आहे. दररोज तालुक्यात दहा ते पंधरा रुग्ण हे कोरोनाचे सापडत आहेत, यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे , ग्रामीण भागातील अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.

जळकोट तालुक्यात बरोबर मार्च २०२० मध्ये लॉक डाऊन लागले होते आणि यानंतर बरोबर मार्च २०२१ मध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे अनेक निर्बंध लागलेले आहेत. विशेष म्हणजे जळकोटचा आठवडी बाजार गत दोन ते तीन आठवड्यापासून बंद आहे, आठवडी बाजार भरत नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनता सोमवारी बाजारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत नाही, यामुळे एक प्रकारे प्रशासनाने जो आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा एक प्रकारे कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी फायदाच होत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातही या कोरोनाची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, एकमेकांच्या घरी जाणे तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, तसेच लग्नाचे आयोजन करणे हे सर्व टाळले जात आहे , तसेच विनाकारण तालुक्याच्या ठिकाणी येणा-याची संख्याही कमी झाली आहे . या कोरोनाची ग्रामीण भागांमध्ये विशेष काळजी घेतली जात आहे . ग्रामीण भागामध्ये कोरोनाची भीती असली तरी सर्दी ताप अंग दुखी अशी लक्षणे दिसली तरी , अनेक जण कोरोनाची तपासणी करून घेण्यास भीत आहेत.

जर आपण तपासणी करून घेतली आणि टेस्ट जर पॉझिटीव निघाली तर काय असा प्रश्न देखील अनेकांना पडत आहे तर काहीजण थोडे जरी लक्षणे दिसली तरी तात्काळ रुग्णालयात जाऊन अँटीजनकिंवा आरटीपीसीआर टेस्ट करून घेत आहेत. ग्रामीण भागामध्ये काही नागरिक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत तर काही नागरिक मात्र अद्यापही तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे.

सामने योजनेनुसार होतील – नवाब मलिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या