चाकूर : तालुक्यातील लातूररोड-जवळ असलेल्या कडमुळी शिवारातील कैलास टेकडी-हाकानीबाबा याञेवर महा भंयकर अशा कोरोनाचे संकट आल्याने भाविक या ठिकाणाकडे फिरकलेच नाहीत .त्यामुळे हा सर्व परिसर भाविकाविना भकास सुनासुना झाला होता.
या कैलास टेकडी-हाकानीबाबा याञे साठी दर वर्षी हजारोच्या संख्येने ंिहदू-मुस्लीम भाविक भक्त हजेरी लावतात.कांही जण आपले नवस फेडण्यासाठी हजर असतात तर काही जणं भक्ती भावाने दर्शनासाठी येतात. लातूर जिल्हातील सर्व गावा गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असत, चाकूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक जण पायी चालत येणाºयांची रांगच असते़ एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील, कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावांमधील नागरिकही मोठ्या संख्येने येत असत.
रेलवेची सुविधा असल्याने ही संख्या वाढत असे. तसेच एस टी महामंडळाच्या वतीने ही खास ५० बसेसची व्यवस्था केली जात असे, यासाठी तात्पुरते बसस्थानक उभे केले जात होते.पिण्यांच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत असे. तसेच पुजा साहित्य दुकाने,रहाट पाळणे,मिठाईची दुकाने, हाँटेल आदी ची मोठी रेलचेल असते़ माञ या वर्षी महाभयंकर कोरोनाच्या संकटामुळे ही याञा भरली नाही. त्यामुळे या परिसरात मोठा शुकशुकाट होता. कैलास टेकडी-हाकानीबाबा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भगवा ध्वज कैलास टेकडीवर लावला आणि मोलवी यांनी हाकानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवली.
Read More अणदूरमध्ये ४ जणांना कोरोनाची लागण, ४ दिवसाचा जनता कफ्यू