22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर किल्लारीत कोरोनाचा शिरकाव

किल्लारीत कोरोनाचा शिरकाव

एकमत ऑनलाईन

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथे दि. ३१ जुलै रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात रॅपिड टेस्टमध्ये कोरोनाचे दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले होते. यात एक महिला व एक पुरुष आहेत. हे दोन रुग्ण आढळल्यानंतर दि. १ ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयात ३० नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात तीन जण पॉझिटीव्ह व २७ जण निगेटीव्ह आले. पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये एक आशा कार्यकर्ती व दोन मुली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे रेफर करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सचिन बालकुंदे यांनी दिली.

यामुळे पोलीस स्टेशनच्या पाठीमागील भाग व स्वामी गल्ली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करुन सील करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच तालुका सुपरवायझर टोंपे व प्रभाकर मोरे, तसेच वैद्यकीय अधिकारी टी. सी. शिंदे (पोमादेवी जवळगा) तसेच आरोग्य सेवक डी. एस. बनसोडे, एस. एस. पवार, श्रीमती कार्ले आर. बी., किल्लारीचे तलाठी विजयकुमार उस्तुरे, ग्रामविकास अधिकारी टी. डी. बिराजदार, माजी जि. प. सदस्य दिलीप लोहार, सरपंच शैलाताई लोहार, उपसरपंच युवराज गायकवाड यांच्यासह सर्व आशा कार्यकर्त्या यांनी तत्काळ भेट देऊन आरोग्य सेवेला सुरवात केली. किल्लारीत पाच पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता नागरिक तोंडाला मास्क लावून सुरक्षित अंतराचे पालन करीत असल्याचे दिसून येत आहे.

Read More  दूध दरावरून लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow