Thursday, September 28, 2023

उदगीर येथे २ कोरोना रुग्ण वाढले

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकूण ६१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ त्यापैकी सर्वच १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथून एकुण ८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ त्यापैकी ६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. किल्लारी येथील ३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्वच ३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. चाकूर येथील एका व्यक्तीचे स्वॅब तपाणीसाठी आले होते त्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Read More  उदगीर शहर १९ मेपर्यंत कोरोनामुक्त होईल

बीड येथील १७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व १७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ उस्मानाबाद येथील १९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ त्यापैकी १८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहेत असे एकूण ६१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ५८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या