लातूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या निरंक आहे. दि. १७ मे रोजी जिल्ह्यात ९८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५ हजार ३४४ जणांना कोरोनाची बांधा झाली असून यापैकी १ लाख २ हजार ८५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाने आतापर्यंत २ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दररोज १५० ते २०० स्वॅबच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या शुन्य आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून दररोज कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मुंबई आणि धुळे येथे कोरोनाचे नव्याने रुग्ण सापडल्याने ही काळजी घेतली जात आहेत.