Saturday, September 23, 2023

शिरूर अनंतपाळ तालुक्यात आढळला कोरोना रुग्ण

१९ वर्षीय तरूणाला संसर्ग, शिवपूरमधून शिरकाव

तालुक्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला असून १९ वर्षीय तरूणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना मुक्तअसलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात शिवपूरमधून कोरोनाचा शिरकाव झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आले, असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.एच. पवार यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी तालुक्यातील जनेतेने आतापर्यंत खबरदारी घेतल्याने तालुक्यात एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला नव्हता.पण दि. ६ जुलै रोजी तालुक्यातील शिवपूर गावांत एक जण कोरोना पॉझीटीव्ह आढळला आहे. याची माहिती मिळताच आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व पं.स. यांच्या संयुक्त पथकाने शिवपूर येथे कंन्टेनमेंट झोन तयार करून पूर्ण गाव सील केले आहे. पाच जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले असून संपर्कात आलेल्या २४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या घटनेने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. शिवपूर येथील १९ वर्षीय तरूण शिक्षणासाठी लातूर येथील मोतीनगर भागात वास्तव्यास होता. त्या ठिकाणी तो कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने या तरुणाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

यात पाच जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथे पाठवून देण्यात आले आहे. तसेच त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या २३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून घराबाहेर पडू नये, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.एच. पवार व पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले आहे

Read More  लेहमध्ये इफड ने उभारले रणगाडयाचा भार पेलणारे तीन पूल

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या