22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरकोरोना रुग्ण, नातेवाईकांना जेवणाचे डब्बे मोफत; अहमद्पुरात तरुणांचा मदतीचा हात

कोरोना रुग्ण, नातेवाईकांना जेवणाचे डब्बे मोफत; अहमद्पुरात तरुणांचा मदतीचा हात

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : या शहरातील कोवीड हॉस्पीटल व विविध रूग्णालये, शासकीय रूग्णालयातील कोरोना रूग्णांना व नातेवाईकांना विनामुल्य जेवणाचे डब्बे वाटप करण्याचा कार्यक्रम गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असून हा उपक्रम रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी एक आधार बनला आहे शहरातील पाच तरुण एकत्र येऊन. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने रुग्णांना व नातेवाईकांना कोवीड हॉस्पीटलसह इतर हॉस्पीटलमध्ये डब्बे मोफत पोहचविण्याचे काम करीत आहेत.

अहमदपूर शहरातील चार कोवीड हॉस्पीटल तसेच इतर हॉस्पीटल, शासकीय ग्रामीण रुग्णालया मध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या कोरोना रूग्णांचे व नातेवाईकांचे हॉटेल सेवा बंद असल्यामुळे जेवण्याच्या डब्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक जण कोरोना पॉझीटीव येत असल्यामुळे येथे आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. हे चित्र वारंवार शहरात दिसून येऊ लागल्यामुळे शहरातील विलास शेटे, शंकर मुळे,नयुम शेख, गोपीनाथ जायभाये, माधव भदाडे या पाच युवकांनी रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रिद वाक्य घेऊन या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

६० डब्यावरून १५० जेवणाचे डबे रोज सकाळी १२ वाजता आणी संध्याकाळी ८ वाजता शहरातील पाटील हॉस्पीटल, बिराजदार हॉस्पीटल, कदम हॉस्पीटल, विठाई हॉस्पीटल, शासकीय ग्रामीण रूग्णालय व इतर रूग्णालये रस्त्यावर फिरणारे मनोरूग्ण व गृह विलिगीकरणात असलेल्या रूग्णांनाही जेवणाचे (वरण,भात,भाजी,चपाती, खीर, शेंगदाने) डब्बे घरपोच विनामुल्य वाटप करू लागले आहेत. ही सेवा २६ एप्रिलपासून सुरू केली असून १५ मे पर्यत सुरू राहणार आहे. आजपर्यत जवळपास दोन हजार डब्यांचे वाटप केले आहे. तसेच सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत शहरात बंदोबस्तावर असलेले पोलीस, नगरपालिका कर्मचारी ,अधिकारी यांनाही चहा व बिस्कीटचे वाटपही करण्यात येत आहे आणी प्रशासनाने जर यापुढेही लॉकडाऊन जाहीर केला तर सदरील सेवा निरंतर सुरू राहील त्यांना त्यांच्या मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या