Tuesday, October 3, 2023

लातूर जिल्हयातील १२३ ग्रामपंचायतीपंर्यंत पोहोचला कोरोना

लातूर : कोरोना विषाणूने जिल्हाभर हातपाय पसरले आहेत लातूर जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायतीपैकी १२३ ग्रामपंचायतीपर्यंत कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे़ आजपर्यंत ग्रामीण भागातील ७४९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे़ शहराच्या बरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दि़ १५ ते ३० जुलै दरम्यान कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संचार बदी लागू केली आहे.

लातूर जिल्हयात मंगळवार पर्यंत १ हजार २२७ कोरोना बाधीत झाले आहेत़ यात ग्रामीण भागातील ७४९ जणांचा समावेश आहे. लातूर जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायतीपैकी १२३ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आजपर्यंत २६१ बाधीत झोन तयार करण्यात आले होते. यापैकी १६३ बाधीत झोन सध्या कार्यरत असून ९८ बाधीत झोन मधील कोरोनाची लागण झालेले रूग्ण बरे झाल्याने सदर झोन बंद करण्यात आले आहेत़ कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची टिम जोमाने काम करत आहे़ त्यास पोलिस प्रशासनाचेही सहकार्य मिळत आहे.

लातूर जिल्हयात २५ सर्वाधिक बाधीत क्षेत्राचे झोन उदगीर तालुक्यात झाले आहेत़ लातूर तालुक्यात २२, निलंगा तालुक्यात २०, औसा तालुक्यात १६, अहमदपूर तालुक्यात १५, देवणी तालुक्यात ८, चाकूर तालुक्यात ७, रेणापूर तालुक्यात ६, शिरूर अनंतपाळ तालुक्यात २ कोरोना बाधीत झोनचा समावेश आहे़ या बाधीत झोनमधून ७४९ कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत़ लातूर जिल्हयातील कोरोना विषाणूचा प्रसार थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि़ १५ ते ३० जुलै दरम्यान संचार बदी लागू केली आहे.

५० वर्षावरील साडेतीन लाख नागरीकांची आरोग्य तपासणी
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागातील ५० वर्ष वयाच्या वरच्या ३ लाख ८९ हजार ६०६ नागरीकांची आजपर्यंत आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन रक्तदाब, मधूमेह, किडणीचे आजार, सर्दी, ताप, खोकला, सारीचे लक्षणे आहेत का याची नियमित आरोग्य तपासणी करत आहेत़ यात ७१ हजार ४५४ नागरीक दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे आरोग्य तपासणीतून समोर आहे़ आजाराची गंभीर लक्षणे दिसत असलेल्या ५ हजार ६९९ व्यक्तींना संदर्भ सेवा देण्यात आली आसून ५ हजार ६२७ नागरीकांची डॉक्टरांनी तपासीणी केली़ त्यापैकी २३१ नागरीकांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत़ १७९ नागरीकांचे स्वॉबही तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत.

सधन व्यक्तींनी पल्स ऑक्सिमीटर खरेदी करावे
४लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हयातील सदन व्यक्तींनी आपल्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी पल्स ऑक्सिमीटर खरेदी करून घरच्या घरी कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

६४ जणांचा मृत्यू
लातूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग होऊन आज पर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे़ यात लातूर शहरात सर्वाधिक २४ जणांचा, उदगीर तालुक्यात १८ जणांचा, औसा व निलंगा तालुक्यात प्रत्येकी ९ जणांचा, लातूर तालुक्यात २ जणांचा, तर अहमदूपर व जळकोट तालुक्यातील प्रत्येकी एक असा दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना वार रूम तत्पर
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कोरोना वॉर रूम मधून गतीमान हालचाली होत आहेत. सकाळ पासून ते रात्री ९ वाजेपर्यत आरोग्य विभागाचे कर्मचारी सेवेत असून कोरोना विषयीची विविध माहिती संकलीत सर्व विभागांना कळवली जात आहे.

Read More  दोन चिमुकल्यांची कोरोनावर केली मात

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या