30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरगुढी पाडवा सणावर कोरोनाचे सावट

गुढी पाडवा सणावर कोरोनाचे सावट

एकमत ऑनलाईन

लातूर : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. यानिमित्त गुढी पाडव्याचा मान असलेल्या साखरगाठींसाठी लातूरच्या बाजारपेठेतील कांही दुकाने उघडली होती.मात्र जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणामुळे बाजापेठेत ग्राहकांची संख्या विकेंड नंतर खरेदीसाठी अधिक दिसून आली. तसेच यावर्षी साखरेच्या व खोब-याच्या हारांच्या किंमती स्थिर आहेत. गुढी पाडवा सणावर कोरोनाचे सावट दिसून येत आहे.

साडेतीन मुर्हुतापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा होय. या दिवशी नागरीक विविध वस्तू, सोने, मालमत्ता, वाहने खरेदी करतात. मात्र वाढत्या कोरोना विषाणूचा धोका पहाता सदर दुकाने, शोरूम बंद असणार आहेत. या सणाच्या निमित्त गुढीसाठी व लहान मुलांना भेट देण्यासाठी साखरेचे व खोब-यांच्या हारांना मागणी असते. लातूरच्या बाजार पेठेत विविध प्रकारच्या साखरगाठी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत.

शनिवारी व रविवारी शासनाने विकेंड जाहिर केल्याने बाजार गोलाईची बाजार पेठ पूर्णत: बंद होती. तर सोमवारी गंज गोलाईत दुकाने उडली नसली तरी हात गाडयावर व कांही दुकानांच्या समोर गुढी पाडव्यासाठी लागणारे हार विक्रीसाठी आले होते. गुढी पाडव्याचा सण अवघ्या एक दिवसावर अल्याने ग्राहकांची हार खरेदीसाठीची लगबग दिसून आली.यावर्षी हारांच्या किंमती गतवर्षीच्या दराप्रमाणेच ग्राहक नसल्याने स्थिर आहेत. यात बताशाचे हार होलसेल दरात १०० रूपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहेत. पेटी साखरेचे हार होलसेल दरात १०० रूपये प्रमाणे प्रति किलो. तर खोब-याचे हार होलसेल दरात २०० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत आहेत.

सोखरेचे व खोब-यांच्या हारांचे दर स्थिर
गुढी पाडव्याचा सणासाठी दरवर्षी मोठया प्रमाणात पेटी हार, बत्तासे हार व खोबर हारांची विक्री होते. मात्र यावर्षी थैमान घालणा-या कोरोना विषाणूमुळे हारांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस विकेंड असल्याने नागरीक घराच्या बाहेर खरेदीसाठी पडले नाहीत. सोमवारी ब-यापैकी साखरेच्या व खोब-याच्या हारांना ग्राहकांच्याकडून मागणी होत आहे. मात्र वाढत्या कोरोनामुळे कोणत्याही क्षणी बाजार बंद होण्याची शक्यता असल्याने साखरेच्या व खोब-याच्या हारांची जेमतेम तयारी केल्यामुळे आज त्याचे शॉर्टज होताना दिसून येत आहे. यावर्षी हारांचे दरमात्र स्थिर असल्याचे विके्रते अशीफ शेख यांनी सांगीतले.

कवाळयांना मागणी
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागरीक घरात कवाळे बांधतात. लातूरच्या बाजार पेठेत कवाळे विक्रीसाठी आले होते. १०० रूपयांना एक प्रमाणे कवाळयाची विक्री होताना दिसून आली. तसेच स्नान करण्यासाठी लागणारा पिसूळाही विक्रीसाठी आला होता. नागरीक पिसूळा व कवाळे खरेदी करताना दिसून आले.

तुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या