26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeलातूरपोहरेगाव येथे ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा

पोहरेगाव येथे ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा

एकमत ऑनलाईन

पोहरेगाव (शरद राठोड) : रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे पुन्हा हळूहळू कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढू लागले. पोहरेगाव येथे ६ रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता. त्याच्यामधून ३ रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना सेवा बजावताना कोरोनाची लागण झालेली आहे.

पोहरेगाव परिसरातील निवाडा, डिघोळ, भोकरंबा, ईटी, सिंधगाव याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. पोहरेगाव येथे आरोग्य केंद्र असल्या कारणाने परिसरातील ३२ गावांना याठिकाणी तपासणीसाठी यावे लागते, त्यामुळे एवढ्या गावाचा भार असतानाही न कळत संपर्क आल्याने या कर्मचा-यांना विलगीकरण येथे पाठविण्यात आले आहे तर उर्वरित २ रुग्णांना कोंिवड सेंटर येथे विलगीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या तिन्ही व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली असता ही संख्या वाढली नसून या रुग्णाची रवानगी विलनीगीकरणात करण्यात आलेली आहे.

त्यामुळे संपर्कातील व्यक्तीना कोरोनाचा प्रादुभाव वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांच्याकडून नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गावातील व्यक्तींना ताप,सर्दी व खोकला अशी लक्षणे जाणवल्यास घरीच न थांबता तात्काळ दवाखान्याकडे तपासणीसाठी हजर होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव यांनी सांगितले आहे. तसेच या कोरोना बाधित व्यक्तीच्या घरातील व व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलेले दिसून येत आहे. तसेच या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील ३ घरे सील करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून आरोग्य विभागातील कर्मचारÞी व आशा अंगणवाडीकडून अधिकारीसमवेत सर्व गावक-यांची खबरदारी म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. बाधितांच्या घराजवळील पाहणी आरोग्य कर्मचारी एस.एन. पांचाळ,व्ही.आर. पवार,श्रीमती के.पी.नागटीळक, दैवशाला चेपट यांनी केली.

मोदी सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांची पिळवणुक थांबवावी – अ‍ॅड.सुप्रिया बोराडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या