30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यात ११ महिन्यांत १ लाख ८७ लोकांची कोरोना टेस्ट

लातूर जिल्ह्यात ११ महिन्यांत १ लाख ८७ लोकांची कोरोना टेस्ट

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना महामारीस प्रतिबंध घालण्यात लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊन शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार २२१ लोकांची कोरोना टेस्ट केली. त्यात ७० हजार ९४६ आरटीपीसीआर टेस्टचा तर १ लाख १६ हजार २७५ रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्टचा समावेश आहे. ७० हजार ९४६ आरटीपीसीआर चाचणीत ८ हजार ५२१ तर १ लाख १६ हजार २७५ रॅपिड अ‍ॅटीजेन चाचणीत १५ हजार ३२८ असे एकुण २३ हजार ८४९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

संपूर्ण देशभरात कोरोना महामारीचा कहर सुरु होता. लातूर जिल्हा मात्र कोरोनापासून मुक्त होता. मात्र जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढत गेली. प्रारंभीच्या पाच महिन्यांत म्हणजेच जुलैपर्यंत कोरोना बाधितांची संख्या जेमतेम होती. परंतु, जुनमध्ये लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता मिळाली. परिणामी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी शहरांतील नागरिकांनी आपले गाव गाठले आणि कोरोना रुग्ण संख्येत पाहता पाहता वाढ झाली. आगस्ट महिन्यांत रुग्णसंख्या सहा हजाराच्या घरात गेली. त्यानंतर सप्टेंंबर महिन्यांत कहरच झाला. या एका महिन्यात १ हजार १८८ इतकी रुग्णसंख्या झाली. ऑक्टोबर महिना जिल्ह्यासाठी दिलासा देणार ठरला. या महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत गेली. डिसेंबर महिन्यांत १ हजार १५० करोना रुग्णांची भर पडली तर नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात आतापर्यंत ८२३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतर रुग्णांनी मात्र कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

कोरोना महामारीने गेल्या काही दिवसांत काहींचा पिच्छा सोडल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांत रोज ३० ते ४० रुग्ण संख्या समोर येत आहे.. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर ही संख्याही आणखी खाली येऊ शकते. आज घडीला जिल्ह्यातील ३१ संस्थांमध्ये ४६४ करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आयसीयुमध्ये ४, गंभीर मेकॅनिकल व्हेंटीलेटर ४, गंभीर बीपायर व्हेंटीलेटरवर ९, मध्यम ऑक्सिजनवर ५२, मध्यम ऑक्सिजनवर नसलेले २५ व सौम्य ३७० रुग्ण आहेत.

३ हजार ५६१ खाटांपैकी ३ हजार ३२९ खाटा शिल्लक
लातूर जिल्ह्यातील ३१ विविध संस्थांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. या ३१ संस्थांमध्ये ३ हजार ५६१ खाटा (बेड) उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परंतु, सध्या कोरोनाचा कहर काहींसा कमी झाल्याने या संस्थांमध्ये केवळ २३४ एवढेच रुग्ण उपचार घेत असून ३ हजार ३२९ खाटा शिल्लक आहेत. एक काळ होता रुग्णांना खाटासाठी प्रतिक्षा करावी लागत होती.

बरे होण्याची टक्केवारी ९५.२८
लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ८४९ एवढी आहे. त्यापैकी २२ हजार ७०२ जण उपराने बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९५.२८ एवढी आहे.

११ महिन्यांत कोरोनाचे २३ हजार ८४९ रुग्ण
गेल्या वर्षीचा मार्च ते सप्टेंबर हा सात महिन्यांचा काळ लातूर जिल्ह्यासाठी मोठा कठीण होता. कोरोना महामारीने या कालावधीत प्रचंड भिती निर्माण केली होती. पण आता कोरोना प्रभाव कमी झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दैनंदिन अहवालाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. परंतु, गेल्या अकरा महिन्यांत लातूर जिल्ह्यात २३ हजार ८४९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ६८३ जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्वरीत रुग्णांनी मात्र कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

गावकारभारी सोमवारी ठरणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या