22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeलातूरकुष्ठरोग पीडितांची कोरोना चाचणी

कुष्ठरोग पीडितांची कोरोना चाचणी

एकमत ऑनलाईन

लातूर : मदर तेरेसा यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी कुष्ठधाम येथील कुष्ठरोग पीडितांची कोरोना चाचणी करण्यात आली. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी चाचणीदरम्यान स्वत: भेट देऊन या अभियानाचा आढावा घेतला.

लातूर शहरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने चाचणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. बुधवारी मदर तेरेसा यांची जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी कुष्ठधाम येथील कुष्ठरोगिंची चाचणी प्राधान्याने करण्यात आली. कुष्ठधाममधील महिला व पुरुषांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक आयुब मणियार, रघुनाथ मदने, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.सुधा राजूरकर यांनी कुष्ठधामला भेट दिली. तेथील उपस्थित सदस्यांशी वार्तालाप करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोना चाचणी दरम्यान काही अडचणी आहेत काय याची पालिकेच्या कर्मचा-यांकडून माहितीही घेतली.

महापालिका शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक घटकाच्या चाचण्या केल्या जात आहेत. लवकरच लातूर कोरोनामुक्त होईल. त्यासाठी शहरातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी बोलताना केले. आजपासून शहरात विविध केंद्रांवर चाचण्या केल्या जाणार आहेत. ज्यांना लक्षणे आहेत अशा नागरिकांनी या केंद्रांवर जाऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वल्ड कप ऑफ एंडोस्कोपी स्पर्धेत भारताच्या डॉ. सुर्यप्रकाश भंडारीनी पटाकावले रौप्यपदक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या