22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रपुढील आठवड्यापासून सर्वत्र कोरोना टेस्ट सुरू-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

पुढील आठवड्यापासून सर्वत्र कोरोना टेस्ट सुरू-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

एकमत ऑनलाईन

नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिका-यांनी केले अभिनंदन 

जिल्हाधिका-यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद

लातूर : लातूर जिल्ह्यात सर्वत्र कोरोना टेस्ट पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचा मानस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आज बोलून दाखवला. कडकडीत लॉकडाऊनचा आज चौथा दिवस आहे. नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिका-यांनी नागरिकांचे अभिनंदन केले. ते फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधत होते.

कोरोना टेस्ट सर्वत्र सुरू करणार

पुढे ते म्हणाले की, काही शहरातील काही मानांकित रुग्णालयात कोरोनाच्या टेस्ट सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध व्हावी या साठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्य स्थितीमध्ये सध्या ४६६ पॉझिटिव्ह रुग्ण असून ४८ व्यक्तींचा मृत्यू या दरम्यान झाला आहे.

सहा खाजगी रुग्णालयांनी दाखवली तयारी

लातूर मधील सहा खाजगी रुग्णालयांनी कोरानाशी दोन हात करण्याची मानसीकता दाखवली आहे. या मध्ये अल्फा हॉस्पिटल, बनसोडे हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल, कादरी हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, लातूर स्पेशालिटि हॉस्पिटल यांचा समावेश असून हे रुग्णालये पुढच्या आठड्यात सुरू करण्यात येणार आहेत.

शहर बसेस अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रूपांतरीत करण्यात आल्या

कोरोना रुग्णांना येणे जाण्या करीता व्यवस्था करण्यासाठी लातूर येथील शहर बस या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. बरेच जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांना घरी पाठवण्याकरीता, किंवा रुग्णालय ते कोव्हीडे केअर सेंटर पर्यंत ये जा करण्यासाठी मोठा फौजफाटा लागत होता. रुग्णांना घरी पाठवताना अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More  जिल्हयात सोमवारपासून संचारबंदीत शिथीलता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या