24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरनिलंगा व शिरूर अनंतपाळ येथे कोरोना योध्याचा सत्कार

निलंगा व शिरूर अनंतपाळ येथे कोरोना योध्याचा सत्कार

एकमत ऑनलाईन

निलंगा : कोरोना महामारीच्या संकटात लॉकडाऊन असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आहोरात्र जनतेच्या सेवेत असलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार व सन्मान करुन माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वत: युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरातील शिवाजी चौकात कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला.

आ. संभाजीराव पाटील यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या परिसरातील, संपर्कातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करावा. त्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. त्या सत्काराच्या अविस्मरणीय क्षणांचा फोटो कमेंटमध्ये शेअर व आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला म्हणजे माझ्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचल्या असे मी समजेन. त्या योद्ध्यांच्या चेहºयावरील आनंद, समाधान आणि हास्याचे क्षण हेच माझ्यासाठी सर्वाधिक मोलाच्या शुभेच्छा ठरतील. पोलीस, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, ड्रायव्हर, शेतकरी, आशा कार्यकर्त्या, दुकानदार यासारख्या असंख्य लोकांचे आपल्यावर उपकार आहेत, असे मला वाटते. त्यांनी स्वत:चा आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांचे जीवन सुरळीत चालावे, यासाठी सेवा प्रदान केल्या, करत आहेत.

एकट्या लातूर जिह्यात १७ हजारांपेक्षा अधिक जण लोकांचे जीवन सुरक्षित रहावे यासाठी लढत आहेत. त्यामुळे या योद्ध्यांचा एखादे पुस्तक, शाल, श्रीफळ किंवा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले होते.

त्याला प्रतिसाद देत निलंगा शहरात नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळळे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, नगरसेवक इरफान सय्यद यांनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. तर दापका येथे डॉ. लालासाहेब देशमुख, डॉ. किरण बाहेती, सुनील टोंपे यांनी मास्क, होमिओपॅथी गोळ््यांचे वाटप केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे यांनी औराद येथे पोलीस, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार केला.

तालुक्यात आपापल्या भागात जनार्धन सोमवंशी, बालाजी मोरे, डॉ. मल्लिकार्जुन शंकद, ज्ञानेश्वर जावळे, कुमोद लोभे, अशोक वाडीक, लक्ष्मण आकडे, अंबादास जाधव, तानाजी बिरादार, पं. स. सभापती राधा बिराजदार, उपसभापती अंजली पाटील, अजित माने, रमेश जाधव, युवराज शिंदे, संदीप बिराजदार, अमीर पटेल, सुधाकर शेतगार, मुख्याध्यापक दत्ता शाहीर आदींसह निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह चाहत्यांनी कोरोना योद्ध्यांचा त्या-त्या भागात सत्कार करुन माजी मंत्री आ. निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

 

 

 

शिरूर अनंतपाळ येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

शिरूर अनंतपाळ : भाजपाच्या शिरूर अनंतपाळ तालुका शाखेच्या वतीने माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे यांच्या हस्ते कोरोनाशी लढा देत असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या अमुल्य कार्याबद्दल सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, अ‍ॅड. संभाजीराव पाटील, डॉ. पवार, प्रकाश कोरे, सूर्यवंशी यांच्यासह भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या