23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home लातूर जनहित स्वच्छता टीमकडून कोरोना योद्यांचा सत्कार

जनहित स्वच्छता टीमकडून कोरोना योद्यांचा सत्कार

निलंगा : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सदैवं जनतेसाठी क्रियाशील असणा-या कोरोना योद्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन येथील जाकीर सामाजिक संस्था अंतर्गत जनहित स्वच्छता टीमच्या वतीने कौतुक व सम्मान करण्यात आला.

यात उपजिल्हाधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ किरण बाहेती, एकमतचे निलंगा तालुका प्रतिनिधी पत्रकार लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर, किल्लारी पी एस आय अमोल गुंडे, डॉ बिराजदार, पत्रकार जीवन जाधव, डॉ अभिषेक सानप, सामाजिक कार्यकर्ते रामंिलग शेरे, अंगणवाडी कार्यकर्ता  सुधाताई वाघमारे, आशा कार्यकर्ते रेणुका कोकणे आदींना कोरोना योद्यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी जाकीर शेख, महेश ढगे, अबू सय्यद, सोहेल शेख, ऋषिकेश पोतद्दार,राम लोंढे, राहूल पोतद्दार,अब्दुल्ला शेख आदी सदस्य उपस्थित होते

Read More  मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow