निलंगा : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंदासाठी स्वत: च्या जिवाची पर्वा न करता रुगणांची सेवा करणाºया आरोग्य विभागातील डॉक्टर्स व कर्मचारी या कोरोना योध्यांचा माजी कॅबिनेट मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोना महामारीने सर्व जगात थैमान घातले आहे. कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी आरोग्य प्रशासनातील कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुगणांची सेवा देत आहेत. त्यांचे मनोबल वाढावे म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दि २७ जुलै सोमवारी रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व सर्व टिमचे पुष्प देऊन सत्कार केला . दरम्यान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते रॅपिड अँटिजेन टेस्टचा शुभारंभ करण्यात आला.
रुगणाचा अहवाल येण्यासाठी एक दिवस वेळ लागत होता मात्र रॅपिड अँटिजेन टेस्टमुळे तात्काळ १५ मिनिटांत रुगणाचा अहवाल येणार आहे शिवाय यावेळी आमदार निलंगेकर यांनी कोविड रुग्णासोबत संवाद साधला. तदनंतर येथील आरोग्य विभागाची पाहणी केली. आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व सर्व टीमचे त्यांच्या कामाबद्दल कौतुक केले तसेच जिल्हा प्रशासनाला येथे सर्व अद्ययावत सुविधा तात्काळ पुरविण्याचे सुचविले .यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ दिलीप सौंदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास कदम , नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ सोळुंके, डॉ लालासाहेब देशमुख, डॉ पाटील आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते
Read More तरुणांची शेतीला पसंती,आई वडिलांच्या कामात मदत